माढ्यात संत मुक्ताबाई पालखीचे स्वागत

किरण चव्हाण
गुरुवार, 19 जुलै 2018

माढा (सोलापूर) - माढयामध्ये संत मुक्ताबाई पालखीच्या आगमनानंतर माढयाचे आमदार बबनराव शिंदे यांनी पालखीचे स्वागत केले. त्याच्या यांच्या हस्ते आरती केल्यानंतर आ. शिंदेंनी गळ्यात टाळ घालून ज्ञानोबा - तुकाराम नामाचा जयघोषाचा ठेका धरत वारकऱ्यासोबत फुगडी खेळली. 

संत ज्ञानेश्वर माऊलींची बहिण असलेल्या संत आदिशक्ती मुक्तबाईचा पालखी सोहळा बत्तीस दिवसात सातशे किलोमीटरचा प्रवास करून बुधवरी (ता. 18) माढयात पोहचला. 

माढयात मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत नगराध्यक्ष गंगाराम पवार, उपनगराध्यक्ष मीनल साठे, दिनकर चव्हाण व नागरिकांनी केले. त्यानंतर आ. बबनराव शिंदे यांच्या हस्ते पालखीची आरती केली. त्यानंतर गळ्यात टाळ घेवून ज्ञानोबा - तुकाराम नामाचा जयघोष करत आ. शिंदेंनी ठेका धरला.  पालखीच्या आगमनामुळे भक्तीमय व उत्साही वातावरणात आ. शिंदेंना फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. आ. शिंदेंनी थोडावेळ वारकऱ्यासोबत फुगडी खेळली. यामुळे वारकऱ्यांमधे व नागरिकांमधे उत्साहाचे वातावरण होते.

Web Title: Welcome to Saint Muktabai Palkhi in the farm