चिमुकल्यांचे फुले देऊन शाळेत स्वागत

राजकुमार थोरात 
बुधवार, 20 जून 2018

वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये चिमुरड्या मुलांना गुलाबपुष्प व पेढे देवून स्वागत करण्यात आले.

वालचंदनगर - लाखेवाडी (ता.इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये चिमुरड्या मुलांना गुलाबपुष्प व पेढे देवून स्वागत करण्यात आले.

येथे जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातुन मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यानिकेतन स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेंट इंग्लिश मिडीयम स्कुल सुरु करण्यात आले आहे. या शाळेतील लहान मुलांचा प्रवेशउत्सव पार पडला. शाळेमध्ये आलेल्या मुला-मुलींचे गुलाबपुष्प,फुगे देवून स्वागत करण्यात आले. आलेल्या सर्व चिमुरड्या मुलांना पेढे देवून त्यांचे स्वागत केले. अनोख्या केलेल्या स्वागतामुळे चिमुरडे विद्यार्थी भारावले होते. यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले,  मंत्रालयातील बांधकाम विभागाचे सचिव दिलिपराव ढोले, सुजाता ढोले , कामधेनु सेवा परीवाराचे प्रमुख डॉ. लक्ष्मण आसबे व संस्थेचे उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे, सल्लागार प्रदीप गुरव उपस्थित होते. 

यावेळी श्रीमंत ढोले म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यालय सुरु करण्यात आले आहे. शाळेमधून मुलांना लहानपनापासुन डिजीटल शिक्षण देण्यावरती भर देण्यात येणार आहे. माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Welcome to the school giving flowers to the students