सुसज्ज आरोग्य केंद्र व्हावे; तनिष्कां सदस्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

तनिष्का सदस्यांनी उपकेंद्र उभारण्यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार जुनी ईमारत पाडून नवीन बांधून देण्या संदर्भात प्रस्ताव आल्याचे ग्रामपंचायतीकडून समजले. परंतु सध्याची जागा इमारतीसाठी अपूरी आहे.  ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मोकळी जागा उपलब्ध करून दिली जात आहे.   
 

कोपर्डे (सातारा) : खासगी वैद्यकीय उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या खर्चीक असल्याने सर्व सामान्य लोकांना आजारपणात सर्वात मोठा आधार असतो तो सरकारी आरोग्य केंद्र व उपकेंद्राचाच. याठिकाणी आरोग्य सेवा मोफत कींवा कमी खर्चात मिळतात. कोपर्डे हवेली उपकेंद्राची जागा अपूरी असल्यामुळे याठिकाणी सुविधांचा अभाव आहे त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर तनिष्कांनी गावात सुसज्ज आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी सीईओ डाॅ. कैलास शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

कोपर्डे हवेली हे गाव मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. गावातील उपकेंद्रास चांगली इमारत नसल्यामुळे गावास कायमस्वरूपी आरोग्य सेवक उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे गावातील व परिसरातील लोकांना खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा आधार घ्यावा लागतो.  खास करुन महिलांना आरोग्य विभागाच्या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रातच जावे लागते. गरोदर महिलांना मसूरला जाणे येणे करणे अवघड जाते. कोपर्डे हवेली गावच्या आसपास शिरवडे, उत्तर कोपर्डे, नडशी, शहापूर, वडोली निळेश्वर, गोपाळ नगर, यादववाडी, पार्ले हि गावे येतात. जर कोपर्डे हवेली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले तर कोपर्डे हवेली व परीसरातील लोकांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या योजनांचा पूरेपूर लाभ घेता येईल. तरी महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कोपर्डे हवेली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी.

तनिष्का सदस्यांनी उपकेंद्र उभारण्यासाठी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार जुनी ईमारत पाडून नवीन बांधून देण्या संदर्भात प्रस्ताव आल्याचे ग्रामपंचायतीकडून समजले. परंतु सध्याची जागा इमारतीसाठी अपूरी आहे.  ग्रामपंचायतीकडून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मोकळी जागा उपलब्ध करून दिली जात आहे.   
 

Web Title: well-equipped health center: The demands of the members of Tanishq