इकडे आड, तिकडे पुर (विहिर)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

भीमा नदीत सोडलेल्या जास्त पाण्यामुळे मंगळवेढा तालुक्यामधील नदीकाठची शेती तर दक्षिण भागातील शेती दुष्काळामुळे अ़चणीत आली आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

मंगळवेढा : भीमा नदीत सोडलेल्या जास्त पाण्यामुळे मंगळवेढा तालुक्यामधील नदीकाठची शेती तर दक्षिण भागातील शेती दुष्काळामुळे अ़चणीत आली आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
            
दरम्यान, उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हाेत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली व नवीन लागण केलेली पिके वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे येथील धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे जादा झालेले पाणी नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे अगदी कमी दिवसात उजनी धरणाने शंभरी पार केली आहे. जादा झालेले पाणी भीमा नदीच्या पात्रातून व उजव्या कालव्यातून सोडण्यात आले आहे. याशिवाय नीरा नदीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

दरम्यान, यामुळे तालुक्यात नदीकाठी असलेल्या उचेठाण, बठाण, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी, तामदर्डी, सिद्धापूर, अरळी या गावातील नदीकाठीच्या शेतीबरोबर कांदा, मका, कडवळ या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. जास्त पाण्यामुळे परिसरातील ऊस व कांदा पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

गेल्या दोन वर्षात कांद्याला मिळालेला दर मकेला लागले लष्कराचा अळीचा विळखा यामुळे यामुळे शेतकऱ्यांचा नदीकाठी कांदा करण्यासाठी कल वाढला आहे अशा परिस्थितीमध्ये लावलेला कांदा पूर्ण पाण्यात गेल्यामुळे शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

कांद्याला मिळालेल्या चांगल्या दरामुळे सुधारित पद्धतीने कांदा केला परंतु भीमा नदीच्या पुराने माझा पूर्ण कांदा पाण्यात गेल्यामुळे मी अडचणीत आलो आहे.- शिवराज पाटील, सिद्धापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Well here and there