डॉक्टरांच्या तत्परतेने वाढदिनी मिळाली त्यांना 'पुनर्जन्मा' ची भेट

प्रताप मेटकरी
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

विटा - डॉक्टरांना परमेेश्वराचे रूप मानले जाते ते उगीच नाही, अशीच एक सुखद घटना खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे घडली. डॉक्टरांच्या तत्परतेने वाढदिनी एका 65 वर्षीय वृध्दास 'पुनर्जन्म' मिळाला.माधवराव रामचंद्र शिंदे (बेणापूर, ता. खानापूर) असे या सुदैवी वृध्दाचे नाव आहे.

विटा - डॉक्टरांना परमेेश्वराचे रूप मानले जाते ते उगीच नाही, अशीच एक सुखद घटना खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे घडली. डॉक्टरांच्या तत्परतेने वाढदिनी एका 65 वर्षीय वृध्दास 'पुनर्जन्म' मिळाला.माधवराव रामचंद्र शिंदे (बेणापूर, ता. खानापूर) असे या सुदैवी वृध्दाचे नाव आहे.

27 ऑगस्टची वेळ पहाटे पाचची तिकडून फोन येतो "डॉक्टर इमर्जन्सी पेशंट आहे, हॉस्पिटलमध्ये लगेच या" डॉ. गणेश यमगर तातडीने पोहचून हृदयविकाराचा झटका आलेल्या बेणापूर (ता. खानापूर) येथील माधवराव शिंदे यांच्यावर वेळेत उपचार केल्याने जीवदान मिळाले. बेणापूर येथील माधवराव शिंदे यांना 27 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी भिवघाट येथील डॉ. गणेश यमगर यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉ. यमगर यांनी लगेच कार्यतत्परता दाखवत वेळेत वैद्यकीय उपचार केल्यामुळे शिंदे यांच्या जीवावर ओढवलेला धोका टळला. आणि योगायोग म्हणजे  27 ऑगस्ट रोजी माधवराव शिंदे यांचा 65 वा वाढदिवस होता. वाढदिवस दिवशी आलेल्या संकटावर शिंदे यांनी डॉ. गणेश यमगर यांनी तत्परतेने केलेल्या उपचारामुळे मात केली आहे. "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" या म्हणीची प्रचिती देत डॉ. यमगर शिंदे यांच्यासाठी 'देवदूत'ठरले. माधवराव शिंदे यांच्यावर वेळेत उपचार झाल्यामुळे शिंदे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला. अन माधवराव शिंदे यांचा 65 वा वाढदिवस चक्क सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करून पुनर्जन्माचे

सामाजिक बांधिलकीतून बर्थडे सेलिब्रेशन झाले. काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर पहिल्यांदाच आलेले हृदयविकार झटकारुपी संकट त्यांना वेळेत मिळालेली उपचाररूपी साथ... अन त्याचा साजरा झालेला वाढदिवस या दिवसभराच्या घटना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव त्याच्या पुनर्जजन्माची साक्ष देत होते.

Web Title: western maharashtra doctor birthday