इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वटवाघूळांचा द्राक्षावरती डल्ला

राजकुमार थोरात
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वालचंदनगर - दुष्काळी परस्थितीमुळे पक्षांनी ही खाद्यासाठी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला असून गतवर्षी तुलनेमध्ये पक्षांनी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त करीत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. 

वालचंदनगर - दुष्काळी परस्थितीमुळे पक्षांनी ही खाद्यासाठी द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला असून गतवर्षी तुलनेमध्ये पक्षांनी द्राक्ष मोठ्या प्रमाणात फस्त करीत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. 

गतवर्षीपासुन इंदापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालू वर्षी पाउस कमी झाल्याने शेतकऱ्यांना कष्टाने द्राक्षांच्या बागा जोपासुन अंतीम टप्यामध्ये आणल्या आहेत. ऑगस्टमध्ये छाटणी केलेल्या द्राक्षबागा परिपक्व झाल्या असून तोडणी सुरु झाली आहे. कमी पावसाचा विविध पिकांवरती परीणाम झाला असून, उत्पादनामध्ये घट होवू लागली आहे. तसेच पक्षांना ही खाण्यासाठी अन्नधान्य शोधण्याची वेळ आली आहे. गेल्या आठ दिवसापासुन कावळे, वटवाघूळ यांच्यासह विविध प्रकारचे पक्षांनी खाद्य शोधत असताना द्राक्ष बागेकडे मोर्चा वळविला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागतील बोरी, भरणेवाडी, अंथुर्णे, बिरंगुडी परीसरातील शेतकऱ्यांच्या बागेतील द्राक्षे पक्षी फस्त करीत आहेत. यामध्ये वटवाघूळ पक्षाचा चा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून वटवाघूळ पक्षी रात्रीच्या वेळी द्राक्ष बागेमध्ये येत असून, परिपक्व झालेले द्राक्षांचे मणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांना वटवाघूळचा सामना करावा लागत आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पक्षी हिरावून घेत असल्याने वटवाघूळ पक्षांना हाकलण्यासाठी शेतकऱ्यांनी थंडीमध्ये ही द्राक्ष बागेमध्ये उजेडासाठी बल्प लावले आहेत. 

द्राक्ष बांगाना साड्यांची झालर...
विविध प्रकारच्या  पक्षापासुन द्राक्ष बागांचे संरक्षण करण्यासाठी तसेच उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेला आडव्या साड्या बांधलेल्या आहेत.  

Web Title: In the western part of Indapur taluka, Vatwagulas grapevine over the vineyard