सिद्धेश्‍वर यात्रेत आज काय झाले विधी (Video)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

900 वर्षाची परंपरा असलेली ही सिद्धेश्‍वर यात्रा सर्वधर्मसमभावचे प्रतिक मानले जाते. यामध्ये विविध समाजाचे सात नंदीध्वज हे प्रमुख आकषर्ण असते. तैलाभिषकाने शुक्रवारी यात्रेतील मुख्य कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यात मंगळवारी अक्षता सोहळा झाला. यानिमित्त मंगलमय वातावणात नंदीध्वजाची निघालेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांचा सहभाग होता.

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यांत्रेतील सातही नंदीध्वजांना स्नान घालण्याचा विधी बुधवारी (ता. 15) संपन्न झाला. सोलापूरमध्ये सर्वात मोठ्या भरणाऱ्या या यात्रेत सात नंदीध्वजाची मिरवणुक काढण्यात येते. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेतील प्रमुख धार्मिक कार्यक्रमाचा बुधवार हा तिसरा दिवस आहे. सकाळी एकापाठोपाठ एक असे सातही नंदीध्वज सिद्धेश्‍वर मंदिराजवळ आले. त्यानंतर मोठ्या उत्साही वातावरणात विविध विधी पार पाडल्यानंतर सिद्धेश्‍वर तलावात त्यांना स्नान घालण्यात आले. 

Image may contain: 14 people, including Prafull Damodare, people standing, wedding, crowd and outdoor

हेही वाचा- कर्जमाफी प्रक्रियेत ही बॅंक आघाडीवर 
दूधगंगेचे स्वरुप 

900 वर्षाची परंपरा असलेली ही सिद्धेश्‍वर यात्रा सर्वधर्मसमभावचे प्रतिक मानले जाते. यामध्ये विविध समाजाचे सात नंदीध्वज हे प्रमुख आकषर्ण असते. तैलाभिषकाने शुक्रवारी यात्रेतील मुख्य कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यात मंगळवारी अक्षता सोहळा झाला. यानिमित्त मंगलमय वातावणात नंदीध्वजाची निघालेल्या मिरवणुकीत हजारो भाविकांचा सहभाग होता.

Image may contain: 8 people, including Ganeshrao Valekar, people standing, sky and outdoor

पांढरा शुभ्र बाराबंदी पोशाख परिधान करून सश्रध्द भावनेने सहभागी झालेल्या भाविकांच्या गर्दीमुळे मिरवणुकीच्या मार्गाला दूधगंगेचे स्वरूप आले होते. गरीब- श्रीमंत असा भेदभाव न करता एकसारखा परिधान केलेला बाराबंदी पोशाख समतेचे प्रतीक समजले जाते. "एकदा बोला भक्तलिंग हर बोला हर, सिध्देश्वर महाराज की जय'च्या जयघोषात बुधवारी नंदीध्वजांना स्नान घालण्यात आले. यावेळी गंगापूजन, सुगडी पुजन असे धामिर्कक कार्यक्रम झाले. 

Image may contain: 2 people, people sitting and shoes

हेही वाचा- ऊस तोडणारी तीन माणसांची टोळी 
पालखी मंदिराकडे... 

बुधवारी सकाळी उत्तर कसब्यातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज श्री सिद्धेश्‍वर मंदीराकडे आणण्यात आले. त्यानंतर परंपरेप्रमाणे सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर तलावात नंदीध्वजांना स्नान घालण्यात आले. यावेळी नंदीध्वजाचे खेळणी काढून ठेवण्यात आले होते. त्यानंतर नंदीध्वजांना तलावात स्नान घालण्यात आले. यावेळी सुरक्षा ठेवण्यात आली होती. स्नान झाल्यानंतर सातही नंदीध्वज, खेळणी श्री सिद्धरामेश्‍वर महाराजांची पालखी वाजतगाजत मंदिरामध्ये नेण्यात आली.

Image may contain: 2 people, people standing, child, outdoor, water and nature


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened today in Siddhesh Yatra