पोलिस कर्मचाऱ्याची पकडली चालकाने कॉलर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

सांगोला (सोलापूर) : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमुळे अपघात होईल म्हणून ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. ट्रक अडविण्याचा तुमचा काय संबंध, असा जाब विचारून पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत आनंदराव भोसले (रा. सोनंद, ता. सांगोला) व अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. 30) सायंकाळी सातच्या सुमारास कडलास नाका ते सांगोला महाविद्यालय दरम्यानच्या परिसरात घडला. 

सांगोला येथे सहायक पोलिस फौजदार पदावर कार्यरत असणारे साहेबराव सुदाम गायकवाड हे कडलास नाका ते सांगोला महाविद्यालय दरम्यान पेट्रोलिंगचे काम करीत होते. या रस्त्याचे काम सुरू असल्याने सिमेंट कॉंक्रिट झालेल्या रस्त्याच्या एकाच बाजूने जाणारी व येणारी वाहने जात आहेत. याच रस्त्यावरून कडलासवरून सांगोलाच्या दिशेने सिमेंटने भरलेला ट्रक (एमएच 10, झेड 0731) वेगाने येत होता. अपघात होईल म्हणून साहेबराव गायकवाड यांनी ट्रकचालकाला हाताने इशारा करून थांबण्यास सांगितले. परंतु ट्रकचालकाने त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्याच्या उद्देशाने गायकवाड यांनी आपली दुचाकी बाजूला घेऊन ट्रक थांबविण्यासाठी मोठ्याने ओरडून ट्रकचालकाला थांबण्यास सांगितले. यावेळी ट्रकचालक रस्त्याच्या बाजूला थांबला असता गायकवाड यांनी ट्रकचालकास पोलिस ठाण्यात चल असे सांगितले. यावर शेजारीच असलेला आनंदराव भोसले गायकवाड यांच्याजवळ येऊन "तुला ट्रक अडवण्याचा काय अधिकार आहे? तू ट्रक पोलिस स्टेशनला कसा घेऊन जातो? तेच मी पाहतो, तुला ट्रक घेऊन जाऊ देणार नाही' असे म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडली. "मला संपूर्ण सांगोला तालुका ओळखतो' असे म्हणून ट्रकचालकाला "तिथून ट्रक घेऊन जा पोलिस काय करतात ते मी बघून घेतो' असे सांगितले. त्यावेळी आणखी तीन जणांनी जवळ येऊन "आम्हाला तू कसा ट्रक घेऊन जातो तेच बघायचं आहे', अशी धमकी देऊन पोलिस कर्मचाऱ्याच्या हातात असलेली दुचाकीची चावी काढून घेतली. त्यानंतर ट्रकचालकास तेथून जाण्यास सांगितले व त्यासोबत चौघेही तिथून निघून गेले. 

यावेळी तेथून जाणाऱ्या दोघांनी श्री. गायकवाड यांना घाबरू नका म्हणून धीर दिला व तुम्हाला बोलणारा व्यक्ती हा सोनंद (ता. सांगोला) येथील आनंदराव भोसले असल्याचे सांगितले. याबाबत सहायक पोलिस फौजदार साहेबराव गायकवाड यांनी सांगोला पोलिसांत आनंदराव भोसले व त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the relationship of track block ..?