पालिका कर्मचारीच वापरतात प्लॅस्टिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, कुपवाड कार्यालयातील कर्मचारी प्लॅस्टिक पिशवी वापरताना सोशल मिडियाच्या जाळ्यात सापडला आहे. या छायाचित्राची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. "लोकांस सांगे..' अशी पालिकेची गत असल्याची टीकाही यावर सुरु आहे.
 

कुपवाड - राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, कुपवाड कार्यालयातील कर्मचारी प्लॅस्टिक पिशवी वापरताना सोशल मिडियाच्या जाळ्यात सापडला आहे. या छायाचित्राची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. "लोकांस सांगे..' अशी पालिकेची गत असल्याची टीकाही यावर सुरु आहे.
 
प्लॅस्टिक बंदीनंतर महापालिका प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली. सांगलीसह मिरज, कुपवाड शहरातील पन्नासपेक्षा जास्त व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. दोन दिवसांत सुमारे दीड लाखांचा दंडही पालिकेने वसूल केला. त्यानंतर व्यापारी असोसिएशनसह विविध संघटनांनी आंदोलने केली. प्लॅस्टिक बंदीचे स्वागत आहेच, परंतू पर्याय मिळेपर्यंत कारवाई शिथील करावी, अशी मागणी केली. तीच मागणी घेवून कुपवाडमधील व्यापारी संघटना आज पालिकेत गेली होती. त्यावेळी तेथील कर्मचारीच प्लॅस्टिक पिशवीतून डबा आणल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने ते छायाचित्र घेवून सोशल मिडियावर व्हायरल केले. 

प्लॅस्टिक वापरताना सोशल मिडियाच्या जाळ्यात सापडलेल्या कर्मचाऱ्याची जोरदार चर्चा आहे. पालिकेने इतरांना सांगण्यापेक्षा प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही प्रबोधन करण्याची गरज आहे. आयुक्तांनी यासाठी विशेष कार्यशाळाही घ्यावी, असे सल्ले देत टीकेची झोड उठवली जात आहे. 

Web Title: When using a plastic bag, the MNP employee get trapped