मिरजेतून कोणत्या एसटी सुरू ? कोणत्या बंद ? जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

  • मिरजेतून कोल्हापूर, इचलकरंजी एसटी सुरु
  • मराठवाड्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही सुरु. 
  • नृसिंहवाडी, कुरुंदवाड व कर्नाटकातील गाड्या अद्यापही बंदच

मिरज - मिरजेतून कोल्हापूर मार्गावरील एसटी वाहतूक अखेर आज सकाळी सुरु झाली. पुरामुळे आठवडाभरापासून बंद होती. अंकली व उदगावदरम्यान रस्त्यावर काही फूट पाणी आल्याने रस्ता बंद होता. मंगळवारी पाणीपातळी खालावली, पण फक्त खासगी जड वाहनेच धावत होती. बुधवारी रस्ता पुर्ण खुला झाला. पण खचल्याने शिरोळच्या तहसिलदारांनी एसटी वाहतुकीला परवानगी दिली नव्हती. दुरुस्तीनंतर अखेर आज सकाळी मिरज आगारातून कोल्हापूरसाठी गाड्या सोडण्यात आल्या. इचलकरंजीसाठीही एसटी धावू लागली. त्यामुळे मराठवाड्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याही सुरु झाल्या आहेत.

हे एसटी मार्ग अद्याप बंदच

मिरजेतून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतुकही अद्याप बंदच आहे. म्हैसाळजवळ कागवाड रस्त्यावर सुमारे तीन ते चार फूट पाणी आहे. त्याची उतरण्याची गती खुपच कमी आहे. रस्ता पुर्ण खुला होण्यास शुक्रवारची सकाळ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरजेतून अथणी, जमखंडी, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा या गाड्या बंद आहेत. कर्नाटक परिवहनने काही अत्यावश्यक गाड्या बेडग-आरगमार्गे सोडल्या आहेत. नृसिंहवाडी व कुरुंदवाडची एसटी सेवाही बंदच आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which ST started from Miraj? Which off?