लाच घेताना पट्टणकोडोली येथील ग्रामसेवक जाळ्यात

लाच घेताना पट्टणकोडोली येथील ग्रामसेवक जाळ्यात

इचलकरंजी - स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाच्या बिलाचा धनादेश काढण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारतांना पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील ग्रामसेवक संभा शंकर उर्फ एस.एस. कांबळे (वय 48) हा रंगेहात सापडला. कबनूर येथील ग्राम पंचायत चौकात आज दुपारी त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

या प्रकरणाच्या तपासात यापूर्वीच तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाल्याने हातकणंगले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद आण्णाप्पा धरणगुत्तीकर यांच्यावर याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उप अधिक्षक गिरीष गोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकांने ही कारवाई केली. 

पट्टणकोडोली ग्राम पंचायतीमार्फत गावामध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम कोटेशन पध्दतीने तक्रारदारांनी घेतले होते. 9 ऑगष्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत हे काम पूर्ण झाले. त्यामध्ये एकूण 75 नगर एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यात आले. त्याचे 1 लाख 55 हजार 400 इतके बिल झाले. हे बिल मिळण्यासाठी तत्कालीन ग्राम सेवक एस. बी. कांबळे यांची भेट घेतली. परंतू त्यांनी त्यांच्या बिलाचा धनादेश काढला नाही. दरम्यानच्या काळात एस. बी. कांबळे यांची बदली झाली. त्यांच्या जागी एस. एस. कांबळे नियुक्ती झाली. 

पाठपुराव्यानंतरही बिल काढण्यास टाळाटाळ
तक्रारादारांनी एस. एस. कांबळे यांच्याकडे बिल काढण्याबाबत पाठपुरावा केला. त्यावेळी त्यांनी कामाची पाहणी करुन बिल काढण्याची हमी दिली. पण बिल काढण्यास विलंब होत असल्याचे पाहून तक्रारदार हे थेट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना भेटले. त्यावेळी त्यांनी ग्रामसेवक कांबळे यांना धनादेश काढण्यास सांगतो असे सांगून 25 हजारांची मागणी केली. 

गटविकास अधिकार्‍यांना दिले दहा हजार
यावेळी तक्रारदारांनी 10 हजार रुपये धरणगुत्तीकर यांना दिले. उर्वरीत रक्कम धनादेश काढल्यावर देण्यास सांगितले. त्यानंतरही बिल न निघाल्यांने तक्रारदारांने पून्हा ग्राम सेवक कांबळे यांची भेट घेवून बिल काढण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी कामाच्या रकमेच्या 25 टक्के रकमेची मागणी केली. त्यानंतर 25 हजार रुपये देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी गेल्या मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

लाचेच्या मागणीची पडताळणी
याबाबत पथकांने साक्षीदाराच्या समक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये दोघांनीही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज ग्रामसेवक एस.एस. कांबळे यांना तक्रारदारांकडून 25 हजारांची लाच घेतांना कबनूर येथील ग्राम पंचायत चौकात रंगेहात पकडले. त्यानंतर तक्रारदार पंचायत समितीमध्ये गेले असता श्री.धरणगुत्तीकर हे रजेवर असल्याचे समजले. 

पट्टणकोडोलीत केला तपास
दरम्यान, ग्रामसेवक कांबळे याला पकडल्यानंतर तातडीने त्याला पट्टणकोडोली येथे पथक घेवून गेले. त्याच्याकडे सखोल चौकशीनंतर रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसांत ग्रामसेवक कांबळे व गट विकास अधिकारी धरणगुत्तीकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com