"सीआयडी'च्या कार्यालयात दडलंय कोण?

Who is behind in the CID office
Who is behind in the CID office

नगर  : आरोपी कोठेही लपला, तरी "सीआयडी'ची यंत्रणा त्याला शोधून काढतेच. "सीआयडी'चा ससेमिरा मागे लागला, की भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मात्र, आपल्या कार्यालयात कोण दडून बसलंय, याचा थांगपत्ता मात्र त्यांना लागला नाही. ही अजब घटना नगरच्या "सीआयडी'च्या कार्यालयात घडली. हे नेमके कसे घडले, याचे अन्वेषण या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी करीत असल्याचे समजते.

त्याचे झाले असे ः शहरात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त गांभीर्याने केला जात नाही. त्यामुळे प्रशासकीय कार्यालये या भटक्‍या श्‍वानांची आवडती निवासस्थाने झाली आहेत. शहरातील चौकांत ठाण मांडून बसणे, प्रशासकीय कार्यालयांत ऐसपैस झोपणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करणे असे प्रकार श्‍वानांमुळे वाढले आहेत.

नगर शहरात गेल्या दोन महिन्यांत सुमारे 20 जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला आहे. गेल्या वर्षी तीन वर्षांच्या मुलाला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे जीव गमवावा लागला होता. तरीही मोकाट कुत्र्यांचा महापालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही.

पाकिटे आली.. पाकिटे आली... 

नगर तहसील कार्यालयाच्या इमारतीत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपअधीक्षक कार्यालय आहे. या कार्यालयात काल (रविवारी) श्‍वान अडकून पडले. रात्रभर भुंकून भुंकून बेजार झाले. त्यामुळे त्याच्या "बिरादरी'वाले गोळा झालेत. परिसरातील नागरिकांना त्या श्‍वानाचे केकाटणे, विव्हळणे ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पोलिस म्हणतात, हिंदी में बात करो... 


कर्तव्यावर जाण्याच्या गडबडीत कर्मचाऱ्यांकडून हे श्‍वान कार्यालयात अडकून पडले असावे. कार्यालयातून बाहेर येण्यासाठी ते आटापिटा करीत होते. रविवारी रात्री आणि आज दिवसभर आत अडकून पडल्याने त्याच्या पोटात कावळे ओरडत असावेत. कार्यालयाच्या उघड्या खिडकीतून डोकावत ते केविलवाणे भुंकत आहे.

शेजारील कार्यालयातील अधिकारी व परिसरातील नागरिक केवळ तेथे जाऊन रिकाम्या हाती परतत आहेत. या श्‍वानाची सुटका करायची कशी? कोण हात लावील, "सीआयडी'च्या कार्यालयाला, अशी चर्चा या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. "सीआयडी'चे अधिकारी मतदानामुळे कर्तव्यावर आहेत. त्यामुळे दुपारी उशिरापर्यंत श्‍वानाला मदत मिळाली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com