मिरजेत बालिका विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

मिरज - दोन अपत्ये असतानाही बेकायदा  बालिका विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अटक केली. अशोक लिंगप्पा ऊर्फ लिंगय्या गुंगल असे संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे. 

मिरज - दोन अपत्ये असतानाही बेकायदा  बालिका विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अटक केली. अशोक लिंगप्पा ऊर्फ लिंगय्या गुंगल असे संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना अशोक गुंगल हा संशयित बालिका विकत घेण्यासाठी अनेक मध्यस्थांना लाखो रुपयांचे आमिष दाखवत फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस उपाधीक्षक गिल यांनी गुंगल याला सापळा रचून अटक करण्याचे नियोजन केले. यासाठी  एक बालिका आणि महिला संबंधित संशयित अशोक गुंगलकडे पाठवली. बालिकेचा विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच रविवारी रात्री बेडग रस्त्यावर रेल्वे रुळानजीक गुंगल याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलिस फौजदार किशोर पवार, पोलिस हवालदार बंडू पाटील, अमर मोहिते, चंद्रकांत गायकवाड, शुभांगी राजमाने, बाळासाहेब डांगे, सचिन ओमासे, मोहसिन फकीर यांनी सहभाग घेतला. याबाबतचा पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार हे करीत आहेत. 

संपर्क साधण्याचे आवाहन
या घटनेस अनुसरून पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी लहान मुलांची योग्य काळजी घेण्यासह रेल्वे, एसटीने प्रवास करताना आपली मुले व्यवस्थित सांभाळण्याचे तसेच कोणाच्याही भरवशावर सोडून जाऊ नयेत. सभोवताली संशयित व्यक्ती आढळल्यास तातडीने १०० नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: who tried to buy a child arrested in MIraj