करमाळ्यात कोण होणार सभापती! 

Who will be the president!
Who will be the president!

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या वर्गासाठी आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे. सध्या माजी आमदार नारायण पाटील यांचे पंचायत समितीवर वर्चस्व असून भविष्यातही त्यांचेच वर्चस्व राहण्याची शक्‍यता आहे. 
सभापती पदासाठी नारायण पाटील गटाकडून विद्यमान उपसभापती गहिनीनाथ ननवरे, गटनेते दत्ता सरडे, अतुल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. तर शिंदे-जगताप समर्थक ऍड. राहुल सावंत यांनी सभापती पदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पंचायत समिती निवडणुकीवेळी पाटील-जगताप एकत्र होते. या निवडणुकीत त्यांनी 10 पैकी सात जागा मिळवल्या, तर बागल गटाला दोन व जगताप व पाटील यांच्या पाठिंब्यावर ऍड. राहुल सावंत विजयी झाले होते. 
पाटील गटातून जया जाधव आमदार शिंदे गटात गेल्या आहेत, तर जगताप व पाटील एकत्र राहिले नाहीत. सध्या पाटील गटाकडे पाच, शिंदे -जगताप गटाकडे तीन, तर बागल गटाकडे दोन सदस्य आहेत. 

राहुल सावंत सभापती पदासाठी इच्छुक आहेत. मात्र बहुमताची गोळाबेरीज करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी ऍड. राहुल सावंत यांना माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडून सभापती पदाची ऑफर देण्यात आली होती. राहुल सावंत हे पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही त्यावेळी झाली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात सावंत यांनी आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला. आता, राहुल सावंत यांना सभापती करण्यासाठी आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सभापती पदासाठी घोडेबाजार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. बागल गटाच्या दोन सदस्यांना फोडण्यासाठी विधानसभेपासूनच शिंदे-जगताप गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. सद्य परिस्थितीत शिंदे-जगताप व बागल गट एकत्र येण्यासारखी परिस्थिती वाटत नाही. मात्र, राजकारणात काहीही घडू शकते याचे अनेक दाखले ताजे आहेत. 

पंचायत समितीचे सदस्य व कंसात त्यांचे गण 
पाटील समर्थक- विद्यमान सभापती शेखर गाडे (केम), उपसभापती गहिनीनाथ ननवरे (वीट), अतुल पाटील (कुंभेज), केशर चौधरी (वांगी), दत्ता सरडे (जेऊर), शिंदे-जगताप समर्थक- राहुल सावंत (पांडे), जया जाधव (साडे), मंदाकिनी लकडे (केत्तूर), बागल समर्थक- स्वाती मुळे (रायगाव), स्वाती जाधव (कोर्टी). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com