कर्जत-जामखेडच्या उमेदवारीसाठी रोहित पवारांसह रुपाली चाकणकर इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नगर जिल्ह्यातील महिलांच्या मागणीनुसार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा महिलेला मिळावी, यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे सांगितले.

नगर : नगर जिल्ह्यातील महिलांच्या मागणीनुसार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा महिलेला मिळावी, यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे सांगितले. रोहित पवार हेदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, नगर जिल्ह्यातील प्रश्न वेगळे आहेत. महिलांना अभय हवे आहे , सध्याच्या सरकारमधील नेते महिलांच्या प्रश्नावर विशेष जागरूक नाहीत, त्यामुळे आगामी काळात महिला संघटन अधिक वाढवून या प्रश्नावर प्रश्‍नावर लढावे लागेल. कर्जत जामखेडची जागा महिलेला मिळावी, अशी मागणी आहे. याबाबत मुलाखतीही झालेले आहेत. या मागणीची दखल घेत वरिष्ठांना कळविले जाईल.

दरम्यान, कर्जत-जामखेड जागे साठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड इच्छूक आहेत. त्यांनी मुलाखतही दिली आहे. याच जागेवर पक्षाचे युवानेते रोहित पवार हेही इच्छुक आहेत. त्यांनी ही मुलाखत दिली आहे. त्यामुळे ही उमेदवारी पवार यांनाच मिळण्याची शक्यता असतानाही मंजुषा गुंड यांनी मात्र ही मागणी किती आहे. उमेदवारी मिळण्याबाबत त्या ठाम आहेत. या पत्रकार परिषदेच्या वेळी मंजुषा गुंड उपस्थित होत्या. या मागणीबाबत त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनीही ही या मागणीवर जोर दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will get Karjat Jamkhed candidacy Rohit Pawar or Rupali Chakankar