महाराष्ट्र उद्योगात आठव्या क्रमांकावर का गेला? याचे उत्तर द्या : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

''माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच महाराष्ट्र उद्योगामध्ये आठव्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर गेल्याचे सांगितले. त्यांनी ही आकडेवारी कोठुन आणली हे मला माहीत नाही. मात्र, उद्योगामध्ये पहिल्या तीन क्रमांकात असणारा महाराष्ट्र ते मुख्यमंत्री असताना आठव्या क्रमांकावर होता. हे सत्य मान्य केले असुन तो आठव्या क्रमांवर का गेला ? याचे उत्तर त्यांनी द्यावे'', असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कऱ्हाड : ''माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच महाराष्ट्र उद्योगामध्ये आठव्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर गेल्याचे सांगितले. त्यांनी ही आकडेवारी कोठुन आणली हे मला माहीत नाही. मात्र, उद्योगामध्ये पहिल्या तीन क्रमांकात असणारा महाराष्ट्र ते मुख्यमंत्री असताना आठव्या क्रमांकावर होता. हे सत्य मान्य केले असुन तो आठव्या क्रमांवर का गेला ? याचे उत्तर त्यांनी द्यावे'', असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. निती आयोग, आरबीआयचा अहवाल पाहिल्यास राज्यात आलेली गुंतवणुक ही मोठ्या प्रमाणात आहे, असेही स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 49 टक्के गुंतवणुक एकट्या महाराष्ट्रातच आली आहे. महाराष्ट्रानंतरची 5 राज्ये एकत्रीत केली तरी, त्यापेक्षा जादाची गुंतवणुक राज्यात आली आहे. मात्र पृथ्वीराज हे आकडेवारी दिली नाही असे म्हणुन, आठव्या क्रमांकावरुन राज्य 13 व्या क्रमांकवार गेले असे सांगत आहेत. मात्र सर्व आकडेवारी ऑनलाईन उपलब्ध आहे.

इपीएफओच्या आकडेवारीत देशात जेवढा रोजगार निर्माण झाला त्यातील 25 टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात निर्माण झाला होता. महाराष्ट्र उद्योगात पहिल्या तीन क्रमांकावर असताना तो आठव्या क्रमांकावर का गेला याचे उत्तर पृथ्वीराजबाबांनी दिले पाहिजे. ते दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Maharashtra go to number eight in the industry