महसूलमंत्री थोरातांच्या गावात का होतोय मोदींच्या धोरणांचा उदो उदो

Why Modi's policies are emerging as revenue minister in Thorata's village
Why Modi's policies are emerging as revenue minister in Thorata's village


संगमनेर, ता. 15 ः थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा भाजप सरकारचा निर्णय रद्द करण्यास जोर्वे येथील ग्रामसभेत विरोध करण्यात आला. हा कायदा कायम ठेवावा, भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदाही कायम ठेवावा, तसेच प्रवरा नदीपात्रातील बेकायदा वाळूउपसा थांबवावा, असे ठराव ग्रामसभेत करण्यात आले. नागरिकत्त्व कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्याला काँग्रेससह इतर पक्षांनी विरोध दर्शवला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या कायद्यास विरोध केला आहे. जोर्वे हे त्यांचे गाव आहे. तरीही त्यांनी मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या धोरणाचा उदो उदो केला जातो आहे. याबाबत काँग्रेससह इतर पक्षांच्या गोटात चर्चा सुरू आहे. तेथील सरपंचही थोरात गटाचेच आहेत, हे विशेष. 

पूर्वीच्या सरकारचा निर्णय योग्यच
सरपंच रवींद्र खैरे यांच्या अध्यक्षतेखाली, जोर्वे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकशाहीचा पाया असलेली पंचायतराज व्यवस्था सक्षम करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सरपंचांची निवड पूर्वी निवडलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांमधून होत असे. मात्र यात होणारी सदस्यांची पळवापळवी व वारमाप पैशांच्या उधळपट्टीतून गुन्हेगारी वाढली होती. यावर निर्बंध आणणारी नवीन व्यवस्था भाजपा सरकारने अस्तित्वात आणून, थेट जनतेतून सरपंच निवड सुरु केली. मात्र नवीन महाविकास आघाडीच्या सरकारने, पुन्हा पहिल्याप्रमाणे सरपंच निवड आस्तित्वात आणल्याने वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे विकास कामांवर विपरीत परिणाम होईल अशी भिती व्यक्‍त करुन जनतेतूनच थेट सरपंच निवडण्याचा कायदा पुन्हा लागु करावा अशी मागणी करण्यात आली. 

महसूलमंत्र्यांच्या गावात वाळूचोरी
याची प्रत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या भारतीय नागरीकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देण्यात आला. जोर्वे गावात वाळू तस्करांचे वर्चस्व वाढले आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वाळु उपशामुळे प्रवरा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालवली आहे. कृत्रीम पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेवून, वाळु माफीयांच्या वाढत्या मुजोरीला पायबंद घालावा यासाठी ग्रामसभेत सर्वानुमते जोर्वे हद्दीतील नदीपात्रातुन होणारा बेकायदेशीर वाळु उपसा बंद करण्याचा ठरावही करण्यात आला आहे. 

या वेळी उपसरपंच गोकुळ दिघे, ग्रामविकास अधिकारी बी. के. पवार, तलाठी बी. ई. गडदे, मुख्याध्यापक बी. डी. काळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शरद थोरात, बाबासाहेब इंगळे, नानासाहेब थोरात, सुनिल तांबे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 
------------------------------------------------------------------------------------------------- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com