तुम्हाला माहिती आहे का? काळा रंग वापरू नये असे का म्हणतात? 

सुस्मिता वडतिले
Sunday, 8 December 2019

आपण एखादी काळ्या रंगाची साडी, कपडे, चुडीदार, शर्ट घातला रे घातला तर लगेच घरातील मोठी मंडळी लगेच ओरडायला सुरवात करतात. काळ्या रंगाला शुभकार्याच्या वेळी स्थान नाही, असे सांगितले जायचे.

सोलापूर : काळा रंग म्हणजे निषेध, काळा रंग म्हणजे अशुभ, काळा रंग म्हणजे असे... काळा रंग म्हणजे तसे... बापरे...! अशी वाक्‍ये अनेकजण ऐकत आलेलेच आहेत. पूर्वीच्या ज्येष्ठ लोकांची मानसिकता काळा रंग वापरल्याने काहीतरी अशुभ घडेल अशी होती. आपण एखादी काळ्या रंगाची साडी, कपडे, चुडीदार, शर्ट घातला रे घातला तर लगेच घरातील मोठी मंडळी लगेच ओरडायला सुरवात करतात. काळ्या रंगाला शुभकार्याच्या वेळी स्थान नाही, असे सांगितले जायचे. 

हेही वाचा : कर्जमाफी राहणार ऑफलाइनच! 
निराशेचे प्रतीक... 

घरात शुभप्रसंगी काळे कपडे वापरल्यास ज्येष्ठ मंडळी रागावत असत. काळा रंग निराशेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात होणाऱ्या शुभकार्यात काळे कपडे परिधान करीत नाहीत, असा समज आहे. तर अनेकजण हा केवळ अंधविश्‍वास आहे, असे समजून त्यावर विश्‍वास ठेवत नाहीत. काहीजण काळा रंग वापरणे योग्य नाही, असे म्हणतात तर काहीजण काळा रंग शुभदिनीही वापरला तर चालतो, असेही बोलतात. या रंगाबाबत अनेकांची वेगवेगळी मते आहेत. काळा रंग वापरू नये, हे सार्वत्रिक विधान आहे, असे दाते पंचांगाचे म्हणणे आहे. प्रत्येकजण या काळ्या रंगांचा निषेध करतोच असे नाही बरं का. ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्‍न आहे. काळा रंग वापरल्याने काहीही फरक पडत नाही, असे अनेकजण सांगत आहेत. 

Image may contain: one or more people, shoes and close-up

हेही वाचा : असा उखाणा तुम्ही ऐकलाय का (व्हिडिओ) 
काहीजण शुभ मानतात 

काळा रंग हा काहीबाबतीत निषेध मानले जाते; परंतु काळ्या रंगाला काहीजण शुभ मानतात, तर काहीजण अशुभ मानतात. काळा रंग वापरू नये, हे सार्वत्रिक विधान आहे. या रंगाबद्दल सर्वत्र वर्ज्य आहे असे सांगितले नाही. याच्याच पलीकडे संक्रांतीला आवर्जून काळे कपडे परिधान केले जातात. 
- मोहन दाते, पंचांगकर्ते 

हेही वाचा : या जिल्ह्यात होईना अनुकंपाची भरती 
काळा रंग मायेचे प्रतीक 

काळा रंग हा अशुभ मुळीच नाही. चित्रकलेच्या माध्यमाने जडत्व वजन आणण्याचे काम हा रंग करतो. काळा रंग हा एक प्रकारे मायेची जाणीव, उबदार सावली, घनदाट छाया निर्माण करणाऱ्या मायेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच लहान बाळाला नजर लागू नये म्हणून काळ्या रंगाचे काजळ लावले जाते. 
- संजय कुलकर्णी, विभागप्रमुख, चित्रकला ग्रेड परीक्षा 

Image may contain: bird

नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधला जातो
काळा रंग हा अशुभ आहे, असे बोलले जाते; परंतु काही पक्षी हे पूर्णत: काळ्या रंगाचे आहेत. त्यात कोतवाल पक्षी हा काळा रंगाचा आहे. या काळ्या रंगाच्या पक्ष्यांमुळे अनेक पक्षी सुरक्षित राहतात आणि इतर पक्ष्यांपेक्षा हे पक्षी सुरक्षित असतात. तसेच नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधला जातो, तिथे या रंगाचा अर्थ चांगला मानला जातो. ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. 
- शिवानंद हिरेमठ, पक्षी निरीक्षक 

...पण काळा रंग 
पूर्वीपासून सांगण्यात आले आहे की काळा रंग अशुभ आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा काळा रंग वापरत नाही. काळा रंग पेहराव केल्यानंतर काही तरी अशुभ घडेल अशी शंका मनात येते. म्हणून काळा रंग वापरण्यास मनाई केली जाते. 
- रतन माने, ज्येष्ठ महिला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why not use black paint