सांगली पालिका आयुक्तांनी का रोखले गटारीचे काम ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात खळबळ माजली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात नगरोत्थान योजनेतून आलेल्या शंभर कोटींच्या निधीतून तीनही शहरात कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण करा अशी सक्त ताकीद आयुक्तांनी तसेच महापौरांनी ठेकेदारांना दिली आहे.

सांगली - वारंवार इशारा देऊनही निकृष्ट काम करण्यात काही सुधारणा होतच नाही, असे आज दिसून आले. स्वत: महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनीच शंभर कोटींच्या निधीतून सुरू असणारे गटारीचे निकृष्ट काम रोखले.

स्वाभिमानी संघटनेने साखर कारखानदारांना दिला हा इशारा 

बिरनाळे शाळेच्या परिसरात सुरू हे काम सुरु होते. याबाबत शहर अभियंता, नगर अभियंता, शाखा अभियंता यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या नोटीसा बजावल्या. आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात खळबळ माजली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात नगरोत्थान योजनेतून आलेल्या शंभर कोटींच्या निधीतून तीनही शहरात कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण करा अशी सक्त ताकीद आयुक्तांनी तसेच महापौरांनी ठेकेदारांना दिली आहे. शिवाय कोणत्याही कामाची अचानक तपासणी करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

काय सांगता ! कापड विक्रेत्याकडे सापडल्या 97 हजारांच्या बनावट नोटा 

अचानक भेट देऊन पाहणी

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी बिरनाळे शाळेच्या परिसरात सुरु असलेल्या गटारीच्या कामाची अचानक भेट देऊन पाहणी केली. सिमेंट गटारीकरण्याचे काम येथे सुरु आहे. आयुक्त कापडणीस यांनी गटारची माजेमापेही घेतली. दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे आढळले.

अनियमितता आढळल्यास ठेकदारावर कारवाई

आयुक्तांनी हे काम जागेवरच थांबवून अयोग्य कामाचा भाग तोडून काम तो पुन्हा योग्य पध्दतीने करण्याचे आदेश शाखा अभियंता परमेश्वर अलकुंटे यांना दिले. तसेच या कामावर देखरेख ठेवून योग्यरित्या काम न करवून घेतल्याबद्दल शहर अभियंता, नगर अभियंता, शाखा अभियंता यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या नोटीसाही त्यांनी बजावल्या. तिन्ही शहरात सुरू असणाऱ्या
कामांवर आयुक्त प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिट देत असून कुठेही कामाबाबत अनियमितता आढळल्यास त्या ठेकदारावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Sangli Municipal Commissioners Stopped Gutter work