कोणत्या मुद्‌द्‌यावरून सुरु आहे सोलापूर शिवसेनेत "घमासान'?

विजयकुमार सोनवणे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

या नगरसेवकांनी दिला महेश कोठे यांना पाठिंबा
अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमेश गायकवाड, देवेंद्र कोठे, विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे, सावित्रा सामल, विठ्ठल कोटा, मंदाकिनी पवार, कुमुद अंकाराम, मीरा गुर्रम, सारीका पिसे, ज्योती खटके, वत्सला बरगंडे व मनोज शेजवाल.

सोलापूर ः महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या (सोमवारी) होणार आहे. या सभेत विरोधी पक्षनेत्याची (अपोझिशन लीडर) भूमिका कोण बजावणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकुमार हंचाटे यांच्या नियुक्तीचे पत्र महापौरांना सकाळीच देण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे, तर आमची म्हणणे ऐकल्याशिवाय हंचाटे यांची नियुक्ती ग्राह्य धरू नये, अशी मागणी कोठे समर्थक 15 नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे उद्या सोलापूर महापालिकेच्या पातळीवर दिवसभर उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे.

प्रिसिजनचे `यांना` मिळणार यंदाचे पुरस्कार

राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत संदोपसुंदी सुरू असताना सोलापूर महापालिकेत शिवसेनातंर्गत गटबाजीला उधाण आले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राजकुमार हंचाटे यांच्या नियुक्तीला महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार दिलीप माने यांच्या विरोधात बंडखोरी केल्याच्या कारणावरून महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह दुसरे बंडखोर उमेदवार मनोज शेजवाळ यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे व तसे पत्र शहराध्यक्षांनी श्री. हंचाटे यांना दिले आहे.

असं करतात पोस्टमार्टेम...

महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदी महेश कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृहात ते शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत. आम्ही सर्वजण शिवसेनेचे नगरसेवक होतो आणि आहोत. पत्रावर स्वाक्षरी केलेल्या सर्व नगरसेवकांची श्री. कोठे यांच्या नियुक्तीस मान्यता आहे. त्यामुळे इत कोणी या पदावर दावा करत असेल तर ते नैसर्गिक न्यायतत्त्वाने योग्य होणार नाही. स्वाक्षरी केलेल्या सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्याशिवाय या संदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, असे महापौर व आयुक्तांना दिलेल्या पत्रात शिवसेनेच्या 15 नगरसेवकांनी म्हटले आहे. त्यामुळे महापौर उद्या (सोमवारी) श्री. हंचाटे यांच्या नियुक्तीचे पत्र स्वीकारणार की कोठे समर्थकांचे म्हणणे ऐकल्यावर निर्णय घेणार हे सभेपूर्वी स्पष्ट होणार आहे.

ढगांच्या अडथळ्यानंतर `अंबाबाई किरणोत्सव` दुसऱ्या दिवशी यशस्वी, पाहिलेत फोटो ?

पूर्वनियोजनानुसार श्री. हंचाटे आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या उपस्थित गेल्या गुरुवारीच (ता.सहा) विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार घेणार होते. मात्र राज्यात सुरु असलेल्या गदारोळामुळे प्रा. सावंत सोलापुरात येऊ शकले नाहीत. त्यामुळे हंचाटे यांच्या नियुक्तीचा विषय मागे पडला. दरम्यान, श्री. कोठे यांच्या समर्थक नगरसेवकांनी श्री. हंचाटे यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसमोर नवा पेच निर्माण होणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on wich points problems in solapur shivsena