विधवेला दाखवले लग्नाचे आमीष! अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

- केली होती मॅट्रीमोनीच्या साईटवर नोंदणी 
- सोलापूरच्या विधवा महिलेवर अत्याचार 
- अहमदनगरच्या तरुणावर दाखल झाला गुन्हा

सोलापूर  : भारत मॅट्रीमोनी या संकेतस्थळावर ओळख निर्माण करून स्वत: विधूर असलेल्या नगर येथील तरुणाने सोलापुरातील घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केले. याप्रकरणी कैलास ज्ञानेश्‍वर विखे- पाटील (रा. लोणी, जि. नगर) याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : संसाराचा डाव सुरू होण्यापूर्वीच मोडला​

मॅट्रीमोनीच्या संकेतस्थळावर नोंदणी
यातील पीडित महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. त्यांना दोन मुली असून त्या भाड्याने राहत होत्या. त्यांनी दुसरे लग्न करण्यासाठी भारत मॅट्रीमोनीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. या वेबसाइटच्या माध्यमातून कैलास याने तो विधूर असल्याचे सांगून सोलापूरच्या महिलेला लग्नासाठी विचारणा केली. दोन्ही कुटुंबीयांकडून जुलै 2019 रोजी लोणी येथे लग्नाची बोलणी झाली.

हेही वाचा : जिमला गेला आणि गुन्ह्यात फसला

लग्नाचे मुहूर्त नसल्याचे सांगितले
दुसऱ्या दिवशी कैलास याने पीडित महिलेस स्वत:च्या घरी नेऊन अत्याचार केले. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त नसल्याचे सांगत कैलास याने पीडित महिलेस तिच्या भावाकडे आणून सोडले. त्यानंतर त्याने फोनवर संपर्क करणे कमी केले. फोन देखील ब्लॉक केले. याबाबत महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावेळी कैलास याने लग्न करणार असल्याचे पोलिसांसमोर सांगितले. त्यानंतर त्याने पीडित महिलेच्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. लग्नाबाबत विचारल्यानंतर लग्न करणार नसल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Widow woman raped