वाळव्यात अंगणवाडी सेविकेची पतीसह आत्महत्या 

वाळव्यात अंगणवाडी सेविकेची पतीसह आत्महत्या 

वाळवा - येथे अंगणवाडी सेविका व त्यांच्या पोस्टमन पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सौ.शहनाज अल्लाउद्दीन आत्तार (44) आणि अल्लाउद्दीन करिम आत्तार (48 रा.मांजरडे ता. तासगाव जि. सांगली सध्या राहणार पेठभाग वाळवा)  अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी आष्टा पोलिसात नोंद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सौ. शहनाज या येथील अंगणवाडी क्रमांक 316 मध्ये सेविका म्हणुन कार्यरत होत्या. अल्लाउद्दीन इस्लामपुर येथील पोस्ट खात्यात नोकरीला होते. काल रात्री त्यांनी जेवण करून मधल्या खोलीत अंथरूण घातले. तिथेच त्यांनी किटकनाशक प्राशन केले. आज सकाळी शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर काहींनी हाका मारल्या. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा मोडुन आत प्रवेश करण्यात आला. तेव्हा दोघांच्या तोंडाला फेस आला होता. झटापट अथवा इतर शंकास्पद कांहीही पोलिसांना आढळले नाही. पोलिस निरीक्षक भानुदास निंबोरे, अनुराधा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सौ. शहनाज या अतिशय उत्साही अंगणवाडी सेविका म्हणून परिचीत होत्या. त्यांनी पतीसह आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त  होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com