पत्नीच्या दागिन्यांसह साडेसात लाखांवर डल्ला

पत्नीच्या दागिन्यांसह साडेसात लाखांवर डल्ला

गांधीनगर - मित्राच्या साथीने आपल्याच पत्नीच्या ‘एटीएम’मधून तसेच घरात फ्लॅट खरेदीसाठी ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने यावर पतीने डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उचगाव (ता. करवीर) येथे घडली.

पती मनीष पाडुरंग लिमकर (९ नंबर बसस्टॉप, उचगाव पूर्व) याने २०१२ ते २०१८ यादरम्यान ‘एटीएम’मधून सहा लाख रुपये, तर फ्लॅट खरेदीसाठी घरात ठेवलेले एक लाख ४९ हजार रुपये आणि सोन्याचे अडीच तोळ्यांचे गंठण, सोन्याचा तीन तोळ्यांचा राणीहार, सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्रातील सोन्याच्या दोन वाट्या, चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण सात लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सोन्याचे दागिने प्रशांत तवदीकर (कणेरी) या मित्राच्या मदतीने लंपास केल्याची तक्रार सपना मनीष लिमकर (रा. उचगाव पूर्व) यांनी गांधीनगर पोलिसांत दिली.

माहिती अशी, की  सपना फॅशन डिझायनर म्हणून काम करतात. पती मनीष याने २०१२ ते २०१८ दरम्यान पत्नीच्या एका बॅंकेच्या  एटीएम’मधून वेळोवेळी सहा लाख रुपये, तसेच फ्लॅट घेणेसाठी घरातील तिजोरीतील एक लाख ४९ हजार रुपये आणि सोन्याचे अडीच तोळ्याचे गंठण, सोन्याचा तीन तोळ्याचा राणीहार, सोन्याचे कानातील टॉप्स, मंगळसूत्रामधील सोन्याच्या दोन वाट्या, चांदीचे पैंजण, चांदीची जोडवी असा एकूण सात लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. 
याकामी पतीचा मित्र प्रशांत यानेही या फसवणुकीत मदत केल्याचे, तसेच पत्नी घटस्फोट देईल, या भीतीने  फिर्याद दिली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com