टिप्पर अन् दुचाकीच्या अपघातात पत्नी जागीच ठार; पती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे . गंभीर जखमीला अकोला रेफर करण्यात आले आहे .

मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष श्रीराम भटकर (वय ४०) ,पत्नी नलिनी संतोष भटकर (वय ३५) हे होंडा शाईन दुचाकी क्रमांक (mh28 Ad 9722) ने मलकापूर येथील पंतनगर मधील खिरोडकर यांचेकडील लग्न आटोपून धुपेश्वर मार्गे घरी अकोला खुर्दकडे जात असताना त्यांच्या मोटर सायकलला धुपेश्वर जवळ भरधाव वेगातील अवैध रेतीच्या टिप्पर क्रमांक (mh 28 Ab 7908) ने जोरदार धडक दिली.

अपघाता नंतर टिप्पर रस्त्याखाली पलटी झाला. या अपघातात नलिनी संतोष भटकर यांचा जागीच मृत्यू झाला तर, संतोष श्रीराम भटकर हे गंभीर जखमी झाले. दरम्यान पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी अँड हरीष रावळ धुपेश्वर येथे आलेले होते. अपघाताचे वृत्त कळताच अँड रावळ यांनी त्यांच्या वाहनातून संतोष भटकर यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृर्ती गंभीर असल्याने त्यांना जळगांव रेफर करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife killed on the spot in Accident of Tipper and bike and Husband is serious