पत्नीचा गळा आवळून शिरोळ तालुक्यात खून

पत्नीचा गळा आवळून शिरोळ तालुक्यात खून

कुरुंदवाड - राजापूरवाडी (ता. शिरोळ) येथे नायलॉनच्या दोरीने गळा आवळून एकाने पत्नीचा खून केला. मंगल रमेश गायकवाड (वय ३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पती रमेश गायकवाड याने स्वत: पोलिस ठाण्यात हजर होऊन दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, की राजापूरवाडी येथील रमेश गायकवाड हे आपली दुसरी पत्नी मंगल आणि मुलगा मुकेश यांच्यासोबत राहत होता. आज रमेश याचा उपवास होता. दुपारी घरी आल्यावर त्याने पत्नी मंगल हिला खिचडी करायला सांगितले. त्या वेळी दोघांत वादावादी झाली. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास चहा करण्यावरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी मंगल हिला मारहाण केली. त्यानंतर ‘मला राहायचं नाही,’ असे म्हणत, मंगल घरातून बाहेर पडून राजापूरवाडी बस स्टॉपजवळ थांबली होती. त्यानंतर पुन्हा रमेश हा पत्नी मंगल हिला अडवण्यासाठी आला. पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली.

त्या वेळी मंगल हिने मंगळसूत्र तोडून रमेशच्या तोंडावर फेकल्याने राग अनावर झाल्याने सोबत आणलेल्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर रमेश हा गावात गेला आणि याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. जमावाने गायकवाड याला अडवून मारहाण केली. गावकामगार पोलिस पाटील अरुण सुतार आले. रमेश याने कुरुंदवाड पोलिसांत हजर राहून याबाबतची फिर्याद दिली. यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब शिंदे, प्रेमकुमार केदार, कॉन्स्टेबल अशोक सरनाईक घटनास्थळी दाखल झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com