नशेत तरुणाकडून पत्नीचा खून

नशेत तरुणाकडून पत्नीचा खून

कोल्हापूर - चारित्र्याच्या संशयावरून व्यसनाधीन पतीने रात्रभर बेदम मारहाण केल्याने विवाहिता कांचन सचिन कोकणी (३१, रा. शाहू कॉलेजसमोर विचारेमाळ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती सचिन बयाजी कोकणी (रा. विचारेमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रात्री उशिरा ही घटना कांचनच्या नातेवाईकांना समजली. 

याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी  विचारेमाळ शाहू कॉलेजसमोर सचिन पत्‍नी,  तीन मुले आणि आईसह राहत होता. आईची मेरी वॉन्लेस हॉस्पिटलसमोर चहाची टपरी आहे. दाम्पत्य मुके आहे. सचिन व्यसनाधीन होता. तो पत्नीवर सतत संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. वादावादीतूनच रविवारी रात्रभर सचिनने कांचनला बेदम मारहाण केली होती.

सचिन थोडा वेळ थांबायचा आणि पुन्हा मारहाण करायचा, असा प्रकार रात्रभर सुरू होता. सकाळी कांचन गंभीर अवस्थेत असल्याचे सासूच्या निदर्शनास आले. त्यानंतर सासू आणि पतीने तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी सचिनवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दुपारीच दाखल केला होता. कांचनवर उपचार सुरू होते. शेजारील लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनीही सचिनला मारहाण करून धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेतील कांचनचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. 

दोघांचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी झाला होता. दोघेही मुके आहेत. दाम्पत्याला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. दोघेही मजुरीला जात होते; पण सचिन नेहमी कांचनला मारहाण करत होता. या मारहाणीतच अखेर कांचनचा मृत्यू झाला. 

दोन महिन्यांपूर्वीही सचिनने मेरी वॉन्लेस हॉस्पिटलसमोरील एका झाडाला दोरी अडकवून गळफास लावून घेण्याचाही प्रयत्न केला होता. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी त्याला समजावून कसेबसे झाडावरून खाली उतरले होते. यासाठी दोन तास पोलिसांना प्रयत्न करावे लागले होते.

मुले झाली पोरकी
व्यसनाधीन सचिनने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे. त्याला या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तिन्ही मुले हर्ष, आर्यन, ज्‍याेती पोरकी झाली आहेत. वयोवृद्ध आजी चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करते. आता नातवांचाही सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com