अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 15 जानेवारी 2019

मंगळवेढा - पत्नीचे इतर पुरूषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा सशंय मनात धरून पतीने ऊसाच्या खांडाने मारल्याचे समोर आले आहे.  संतोष बाळू मासाळ (रा.तपकिरी, ता पंढरपूर) याने दुचाकीवर जात असताना गाडीवरून पडल्याचा बनाव करून पत्नीची हत्या लपविण्याच्या प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या दक्षतेने त्याचा पर्दाफाश झाला. याबाबत प्रमुख आरोपी संतोष मासाळ याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन महिन्यापासून  युरोपियन शुगर्स कारखान्याची ऊस तोडीसाठी टोळी सिद्धापूर येथे वास्तव्यास आहे. 7 जानेवारी रोजी आरोपी संतोष हा आपली पत्नी शिवानी (25) हिला सिद्धापूरहून दुचाकीवर मंगळवेढ्याकडे घेऊन निघाला होता. थोड्या अंतरावर गाडी थांबवून त्याने आपल्या पत्निला ऊसाने मारहाण केली. पुन्हा गाडीवर बसवून ब्रह्मपुरी पासून तीन किलोमीटर आतील बाजूला असलेल्या कालव्याकडे नेत तुझे इतर पुरुषाचे अनैतिक संबंध आहेत अशी विचारणा करत उसाच्या खांडाने मारहाण केली. त्यानंतर अपघात झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. तसेच मेहुण्याला फोन करुन अपघात झाला असून, पत्नीला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले. उपचारादरम्याने तिचा मृत्यु झाला. 

मात्र या प्रकरणात संशय आल्याने मेहूणा दशरथ बालाजी सुळे वय 18 राहणार उंदरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांनी 14 जानेवारी रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. यात बहिणीस ऊसाने मारहाण करून तिच्या डोक्यात कोणत्या तरी अज्ञात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार मारले आहे अशी फिर्याद दिली.  

पोलिसांनी आरोपी संतोष याने 7 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत फोनवरून केलेल्या संभाषणावरून पोलिसांना संतोषने शिवानीला मारले असल्याचा संशय आल्याने त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. महेश विधाते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Wife murdered by husband on suspicion of immoral relationship