चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून ; कुर्‍हाडीने घाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

या घटनेने येवती व परिसरात माेठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना काल (शनिवारी) रात्री येवती (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथे घडली.

रेखा विनोद कांबळे (वय 35, रा. येवती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप शहाजी थोरात (वय 29 रा. वाकुर्डे बुद्रुक ता. शिराळा) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन संबंधित महिलेचा पती विनोद रामचंद्र कांबळे  (रा. येवती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील संशियत आराेपी विनाेद कांबळे यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कऱ्हाड तालुका पोलिसांनी दिली.

ही घटना शनिवारी (ता.2) रात्री घडली आहे. फिर्यादी संदीप थाेरात यांना रात्री नऊ वाजता त्यांचे मामा लक्ष्मण दरागडे यांनी दूरध्वनी करुन रेखा यांच्या डोक्यात त्यांचा नवरा विनाेद याने कुर्‍हाड मारली आहे. रेखा यांना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेल्याचे सांगितले. 

रेखा यांच्यावर उपचार सुरु केल्यावर काही वेळातच वैद्यकीय अधिकारी यांनी त्या मयत झाल्याचे सांगितले, अशी फिर्याद संदीप थोरात यांनी दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी विनोद कांबळे यास ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत.

दरम्यान या घटनेने येवती व परिसरात माेठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife murdered on suspicion near karad