जंगलातील माहितगारांना ‘गाइड’ची संधी

सचिन शिंदे
शुक्रवार, 13 जुलै 2018

कऱ्हाड - जंगलाचा अभ्यास, त्यांच्या ठिकाणांची माहिती, प्राणी, पक्षांचा अभ्यास असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील युवकांना उपजीविकेचे नवे साधन त्यांच्या गावात, जंगलात उपलब्ध होणार आहे. ‘बफर झोन’मधील माहितगार लोकांना वन्यजीव विभागाकडून गाइड होण्याची संधी देण्यात येत आहे. 

कऱ्हाड - जंगलाचा अभ्यास, त्यांच्या ठिकाणांची माहिती, प्राणी, पक्षांचा अभ्यास असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील युवकांना उपजीविकेचे नवे साधन त्यांच्या गावात, जंगलात उपलब्ध होणार आहे. ‘बफर झोन’मधील माहितगार लोकांना वन्यजीव विभागाकडून गाइड होण्याची संधी देण्यात येत आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागीरी जिल्ह्यांतील ४० गावांचा समावेश आहे. त्यात कोकणातील गावांची संख्या कमी आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांतील गावांची संख्या जास्त आहे. त्या गावात वेगवेगळ्या योजना ‘वन्यजीव’तर्फे राबविल्या जात आहेत. अनेक गावांतील महिलांना पिशव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

त्याशिवाय ‘होम स्टे’सारख्या अन्य काही योजनाही डॉ. श्‍यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत हाती घेण्यात आल्या आहेत. त्याच योजनेंतर्गत गाईड प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण योजना वन्य जीव विभागाने हाती घेतली आहे. ती योजना ताकदीने राबवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत किमान १०० युवकांना गाईडचे अधिकृत प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी तयार केले आहे. त्यातील ५० युवक प्रशिक्षित होऊन कार्यरतही झाले आहेत. त्यामुळे त्या योजनेद्वारे व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मधील गावांतील जंगलाचा अभ्यास असणाऱ्या युवकांसह गावातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. 

अनेक गावांत पर्यटन विकासाची कामे सुरू आहेत. अनेक गावांत जन वन योजनेंतर्गत ट्रेकिंग रूट, जंगल सफारीचे नियोजन केले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना त्याची माहिती नसते. अनेकदा पर्यटकांना रस्ताही मिळत नाही. त्यामुळे त्या ट्रकिंग रूटसह जंगलाचा अभ्यास व पशुपक्ष्यांची माहिती असणाऱ्या बफर झोनमधील गावांतील युवकांना गाइड म्हणून तयार करण्याची कल्पना पुढे आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही दिसते आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफारी करून आणण्याची व त्या जंगलातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती देण्याची जबाबदारी गाईडवर असणार आहे. अशा सुमारे पन्नास युवकांना गाइडचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे.

    जंगलासह प्राणी, पक्ष्यांचा अभ्यास असणाऱ्यांना संधी 
    उपजीविकेचे नवे साधन देण्यासाठी ‘वन्यजीव’चा पुढाकार 
    पर्यटकांना जंगलाची ओळख करून देण्याची जबाबादरी
    जन वन विकास योजनेंतर्गत गाइड प्रशिक्षणाची संधी उपलब्ध 
    शंभरावर लोकांना गाइडचे अधिकृत प्रशिक्षण देण्याचा संकल्प 
    ‘बफर झोन’मधील बेरोजगारांना त्यांच्याच गावात रोजगार 

Web Title: wild sahyadri tiger reserve information guide