#PlasticBan प्लॅस्टीक बंदीबाबत कार्यशाळा घेऊ - आयुक्त खेबुडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

सांगली : प्लॅस्टीक बंदीबाबत व्यापाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी लवकरच कार्यशाळा घेतली जाईल असे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज व्यापारी शिष्टमंडळास अश्‍वासन दिले. व्यापारी एकता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांना निवेदन देऊन प्लॅस्टीक बंदीमुळे व्यापाऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या प्रश्‍नांबाबत माहिती दिली. यानिमित्ताने होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबतही विस्तृत चर्चा झाली. 

प्लॅस्टीक बंदीचा शासन निर्णय होताच महापालिका क्षेत्रात सुमारे दिड लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. अचानक सुरु झालेल्या या कारवाईने त्रस्त व्यापारी नेत्यांनी आज आयुक्तांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांना बंदीबाबत सखोल माहिती देण्यासाठी प्रशासानाने भव्य कार्यशाळा घ्यावी. त्याबद्दल व्यापाऱ्यांना माहिती दिली जाईल. पर्यायी व्यवस्थेबद्दल चर्चा होईल. सर्वच गोष्टी सखोलतेने पहिल्या जातील. त्या प्रमाणे व्यापाऱ्यांना सूचित करून अंमलबजावणी केली जाईल. गूळ व्यापारी नरेंद्र तोष्णीवाल, बेकरी असोसिएशनचे नवीद मुजावर, सुरेश पटेल, सोनेश बाफना, धीरेन शहा, मुकेश चावला आदी उपस्थित होते. 

" परदेशात एखादा शोध लावायचा असला तर उंदीर किंवा मांजरावर त्याचा प्रयोग केला जातो, तशीच गत महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांची झाली आहे. आमच्यावर खालील प्रयोग झाले नोट बंदी, जीएसटी, एफडीआय रिटेल याचा परिणाम असा की जीव वाचला पण कंबरडे मोडले. आता प्लास्टिक बंदीचा प्रयोग सुरु झाला. त्यात आम्ही अर्धमेले झालो आहोत. त्यामुळे आता शासनाने आमच्या जगण्यावरच बंदी आणून विषय त्वरित संपवून टाकावा.'' 
- समीर शहा, व्यापारी नेते 

Web Title: will conduct workshop on plastic ban said commissioner khebudkar