मागेल त्याला टॅंकर देणार - शेखर गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

सांगली - जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. टॅंकरसाठी दररोज गावांमधून मागणी येत आहे. आतापर्यंत १२२ गावे टंचाईग्रस्त झाली आहेत. त्यांना १२० टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात पाणी टंचाई गंभीर होत आहे. प्रशासनाकडे जशी मागणी येईल तशी पूर्तता करण्यात येत आहे. पाणी पुरवण्यासाठी उदार धोरण असून मागणी आल्यास तातडीने टॅंकर सुरू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात १२२ गावे आणि ८७० वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी १२० टॅंकर सुरू आहेत. एकूण २ लाख ८८ हजार १६० लोकसंख्येला हा पाणी पुरवठा सुरू आहे. त्यासाठी ११२ खासगी व ८ शासकीय टॅंकर पाणी  पुरवत आहेत. यात जत तालुक्‍यात सर्वाधिक ६१ टॅंकर सुरू आहेत. कवठेमहांकाळ १२, तासगाव १५,  खानापूर १५, आटपाडी १६ व शिराळा तालुक्‍यात एक टॅंकर सुरू आहे. जत तालुक्‍यात ३९, कवठेमहांकाळ ६, तासगाव ३, खानापूर १७ व आटपाडी तालुक्‍यातील २१ खासगी विहीर/बोअर अधिग्रहीत केल्या आहेत.

दुष्काळी भागात तीव्र टंचाई असल्याने मागेल त्याला टॅंकर द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी  केली होती. त्यासाठी टॅंकर मंजुरीचे अधिकार  तहसीलदार किंवा गट विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात यावेत, अशी मागणी होती. त्यांनी कृषी व पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे. अनेक गावांचा पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश नाही. तरीही तेथे टंचाई जाणवत आहे. त्या गावांनाही टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद  सदस्यांनी केली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. टॅंकरही वेगाने वाढत आहेत.’’

पिण्याच्या पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही. टॅंकर देण्याबाबत उदार धोरण आहे. पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दुष्काळी तालुक्‍यांत परतीचा पाऊस झाला नसल्याने टंचाई जाणवत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी  सोडले असले तरी ज्या गावांपर्यंत पाणी पोचत नाही त्यांना टॅंकरचा पर्याय आहे. जसे प्रस्ताव येत आहेत तशी मंजुरी देण्यात येत आहे.
- शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी

Web Title: Will give him a tanker