लोकसभा लढणार नाही : विश्वजित कदम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यापासून काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी आज काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डासमोर 'मी लोकसभा लढणार नाही', असे जाहीर केले.

या बैठकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. विशेष म्हणजे वसंतदादा घराण्यातून त्यांचे नातू विशाल पाटील यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, ते या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस कमिटीत पार्लमेंट्री बोर्डची बैठक झाली. मोहनराव कदम, निरीक्षक प्रकाश सातपुते, सहनिरीक्षक संजय पाटील प्रमुख उपस्थित होते. पार्लमेंट्री बोर्डाचे पदाधिकारी आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार ऍड. सदाशिवराव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींसह 45 सदस्य उपस्थित होते. 

जिल्हाध्यक्ष कदम, निरीक्षक सातपुते, सहनिरीक्षक पाटील यांनी बोर्डाच्या एकेक सदस्यांचे स्वतंत्रपणे म्हणणे ऐकून घेतले. प्रत्येक सदस्यांचे म्हणणे इतरांना समजणार नाही, यासाठी बंद खोलीत गोपनीयता पाळली गेली. बोर्डाच्या सदस्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसला चांगले वातावरण असल्याचे सांगत उमेदवारांची नावे सुचवले. दुपारपासून सायंकाळपर्यंत चाललेल्या बैठकीत सूर पाहिला तर माजी मंत्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या नावाची शिफारस केली गेली. अनेकांनी जिल्हाध्यक्ष आमदार कदम, आमदार विश्‍वजित कदम यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र, जिल्हाध्यक्ष कदम, आमदार कदम यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

सायंकाळपर्यंत बोर्डाच्या 45 जणांची मते आजमावण्यात आली. आजच्या बैठकीचा सविस्तर अहवाल आठवडाभरात प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला जाईल. आणखी कोणी इच्छुक असतील तर त्यांची नावेही प्रदेशकडे पाठवली जातील, असे निरीक्षक सातपुते यांनी सांगितले. प्रदेश कॉंग्रेस कमिटीची 21 रोजी मुंबईत बैठक होणार आहे. त्याबैठकीत निवडणुकीबाबत पुढील सूचना मिळतील असेही सातपुते यांनी सांगितले. 

Web Title: will not contest Lok Sabha says MLA Vishwajit Kadam