लिंगायत समाजाला अोबीसींचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस करू : मुख्यमंत्री

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाला अोबीसीचे प्रमाणपत्र देण्यासाठी अोबीसी समितीकडे शिफारस करू. तसेच मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाला अोबीसीचे प्रमाणपत्र देण्यासाठी अोबीसी समितीकडे शिफारस करू. तसेच मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सोलापुरातील बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने आयोजिलेल्या तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या श्री संकल्पसिद्धी कार्यमहोत्सवानिमित्त
आयोजिलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जगदगुरु व्यासपीठावर होते.

हिंदू लिंगायत असा उल्लेख असल्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाला अोबीसी समाजाचे प्रमाणपत्र मिळत नाही, असा उल्लेख पालकमंत्री श्री. देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेत केला होता. त्याचा संदर्भ देत श्री. फडणवीस म्हणाले, लिंगायत समाजाला अोबीसीचे प्रमाणपत्र देण्यात काही अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी अोबीसी समितीकडे शिफारस करण्यात येईल. तसेच हे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करू. तसेच मंगळवेढ्यातील प्रस्तावित महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाबाबत येत्या पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येईल व भव्य असे स्मारक मंगळवेढ्यात उभारण्यात येईल. देव, देश, धर्म, संस्कृती व परंपरा जपण्याचे
काम जगदगुरूंनी केले, असा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

यावेळी मंत्री मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री फडणवीस यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना आशिर्वादही दिले. मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी विमानतळाकडे प्रयाण केले.

Web Title: Will try to give OBC certificate to Lingayat community, says CM Devendra Fadnavis