भाजपचे झेंडे लावताना दादागिरी करणाऱ्यांचा आम्ही प्रचार करु का ?

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 18 जुलै 2019

प्रत्येक जण तयारी करीत असतो. परंतु कोणी ही ताम्रपट घेऊन आलेले नाही. पक्ष देईल त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करु.

सातारा : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून सर्व सामान्य कार्यकर्त्याने विधानसभा निवडणुक लढवावी असा ठराव सातारा जावळी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी एकमताने माझ्या नावाने नुकत्याच झालेल्या बैठकीत केला आहे. तरी भारतीय जनता पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांस उमेदवारी द्यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अभय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. बूथ निहाय कार्यकर्त्यांनी देखील माझ्या नेतृत्वास मान्यता दिल्याने तसेच जनता जून्या चेहऱ्यांना पाहून कंटाळली असल्याने पक्ष मला उमेदवारी देईल असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. 
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अभय पवार बोलत होते. दिपक पवार हे संभाव्य उमेदवार असणार आहेत या प्रश्‍नावर पवार म्हणाले प्रत्येक जण तयारी करीत असतो. परंतु कोणी ही ताम्रपट घेऊन आलेले नाही. पक्ष देईल त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करु. जूने चेहरे पाहून जनता कंटाळली आहे. तेच तेच उमेदवार पून्हा येऊन निवडणुक लढविणार असतील तर जनता त्यांना स्विकारेल का असा प्रतिप्रश्‍न ही केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा असून तुम्हांला उमेदवारी कशी मिळेल या प्रश्‍नावर आम्ही पक्षाचे निष्ठेने काम केले आहे. पक्षाचे भागात झेंडे लावताना दादागिरी करणाऱ्यांचा आम्ही प्रचार करु असे तुम्हांला वाटते का ? मी शिवेंद्रसिंहराजेंना ओळखतो ते भाजपात येणार नाहीत असा ठामपणे विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will we accept people who opposed bjp ?