‘विलिंग्डन’च्या शताब्दीचा ४ ऑगस्टला प्रारंभ

willingdon-college
willingdon-college

सांगली - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील विलिंग्डन महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता मुख्य सोहळा आणि सात दिवसांची शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष किशोर पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होईल. डेक्कनचे उपाध्यक्ष शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी असतील. 

महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात दररोज सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होईल. शनिवारी (ता. चार) नवी दिल्लीतील पत्रकार सुशील पंडित ‘जम्मू काश्‍मीर ः इतिहास आणि वर्तमान’ या विषयावर  बोलतील. पाच ऑगस्टला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अश्‍विनी भिडे यांची मुलाखत होईल. सहा ऑगस्टला हिवरे बाजारचे सरपंच ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावर बोलतील. सात ऑगस्टला वसंत हंकारे ‘चला आता माणूस घडवूया’ या विषयावर पुष्प गुंफतील. आठ ऑगस्टला लेफ्टनंट अशोक सोमन ‘डोकलाम -दोन टाळता येईल?’ या विषयावर मंथन करतील. नऊ ऑगस्टला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर ‘उच्च शिक्षण आणि नव्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. 

१० ऑगस्टला कोल्हापूरचे आयुक्त इंद्रजित देशमुख ‘राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान’ या विषयावर बोलणार आहेत.’’

खासदार संजय पाटील स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. आमदार सुधीर गाडगीळ नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. डॉ. शरद कुंटे, डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, सागर फडके, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर आदी नियोजन करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com