वाऱ्यासह पावसाने नगरसह परिसराला झोडपले

वाऱ्यासह पावसाने नगरसह परिसराला झोडपले

नगर - शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. पोलिस मुख्यालयातील मोटार दुरुस्ती विभागाचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी वीजतारांवर फांद्या पडल्याने वीजप्रवाह खंडित झाला. दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पावसाने महापालिका व महावितरण विभागाच्या पावसाळापूर्व तयारीची पोलखोल केली आहे.

शहरात आज दुपारी दोनच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही भागांत सुरवातीला गाराही पडल्या. या पावसात महापालिका व महावितरणने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांची पोलखोल केली. 

पहिल्याच पावसाच्या पाण्याने अनेक नाले तुंबले. दिल्ली दरवाजा, नालेगाव, गांधी मैदान, चितळे रस्ता, कापड बाजार, जिल्हाधिकारी कार्यालय, सारसनगर रस्ता परिसर आदी भागांत नाले तुंबल्याने, रस्त्यांवर सुमारे एक ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे या परिसरात वाहतूक ठप्प होती. नालेसफाई करून काढलेला गाळ काही ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच होता, तो पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा नाल्यात गेल्याने नाले तुंबल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. सखल भागातही पाणी  साचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com