"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे 

"आई अंबाबाई' मालिका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे 

कोल्हापूर - अंबाबाईच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येतो. मंदिरात आलो की बाहेर अंबाबाईची "थ्री डायमेन्शियल' प्रतिमा बघायचो; पण परिस्थिती नसल्याने ती खरेदी करता येत नव्हती. साम टीव्हीवरील "आई अंबाबाई' मालिकेमुळे घरबसल्या अंबाबाईची महती समजते. मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत यंदा सहभागी झालो आणि भाग्यवान विजेता ठरल्यानंतर थेट देवीच्या दारातच ही प्रतिमा बक्षीसरूपात मिळण्याचे भाग्य मिळाले... मिरजेतील अंकिता मुंडेकर स्पर्धेत भाग्यवान ठरल्या. त्यांचे वडील राजेंद्र मुंडेकर यांनी या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत "आई अंबाबाई' या मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचे. 

दरम्यान, नवरात्रोत्सवात 10 ते 18 ऑक्‍टोबर या काळात साम टीव्हीवर ही मालिका प्रसारित झाली. मुंडेकर यांच्यासह सृष्टी चव्हाण, प्रसाद कोत्तूर, स्मिता पाटील व शैला सोनसळे हे महाविजेते आणि अमित कांबळे, उत्तम वजाळे या उपविजेत्यांना या वेळी बक्षिसे देण्यात आली. महाविजेत्यांना अंबाबाईची "थ्री डायमेन्शनल' प्रतिमा आणि मंदिरात अभिषेकाची संधी, तर उपविजेत्यांना अंबाबाईची नथ बक्षीस म्हणून देण्यात आली. 

"सकाळ' माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी "सकाळ'च्या एकूण वाटचालीचा आढावा घेतला. "सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, द्वारकादास शामकुमारचे जुगल माहेश्‍वरी, क्‍लायमॅक्‍स ऍड्‌सचे उदय जोशी, करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे केदार मुनीश्‍वर, कलाकल्पना ऍड्‌सचे संजीव चिपळूणकर, ऊर्जा क्रिएशन्सचे अरुण नाईक आदी उपस्थित होते. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान, ही विशेष मालिका पॉवर्ड बाय मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अँड ज्वेलर्स होती. को-पॉवर्ड बाय वारणा दूध संघ, तर चितळे उद्योगसमूह, जाधव इंडस्ट्रीज, पितांबरी, द्वारकादास शामकुमार आणि पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक सहप्रायोजक होते. 

"साम'चा हा उपक्रम चांगला असून मालिकेमुळे जगभरातील भाविकांपर्यंत अंबाबाईची महती समजते. येत्या काळातही देवस्थान समितीचे सहकार्य राहील. 
- महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती 

माध्यमांना कृतिशील कार्यक्रमांचा आदर्श "सकाळ' समूहाने दिला आहे. "साम'च्या मालिकेमुळे अंबाबाईची महती लाखो प्रेक्षकांपर्यंत पोचते आहे. 
- केदार मुनीश्‍वर, श्रीपूजक मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com