हिवाळ्यातील भाजीपाला, फळांना आले मोहक रूप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कोल्हापूर - दुधाळ दवाचं धुकं गुलाबी; पण बोचऱ्या थंडीचा हिवाळा ऋतू बहुतेकांना हवाहवासा वाटतो. हिवाळ्यात खाल ते पचेल या उक्तीप्रमाणे विविध खाद्यपदार्थांचा मनोसक्त आस्वाद घेणारी भूक याच दिवसांत वाढती आहे. ती भूक भागविण्याची क्षमताही निसर्गाने निर्माण केली आहे. त्याच्या छटा बाजारात आलेल्या हिरव्यागार, लाल, पिवळ्या, जांभळ्या अशा बहुरंगी भाज्या, फळांच्या रूपातून दिसत आहेत. रोज साडेचारशे टन भाजीपाला, फळे बाजारात येत आहेत. अशा बहुरंगी भाज्या व फळांच्या ढिगांनी बाजारपेठेला सौंदर्याची जोड लाभली आहे.

कोल्हापूर - दुधाळ दवाचं धुकं गुलाबी; पण बोचऱ्या थंडीचा हिवाळा ऋतू बहुतेकांना हवाहवासा वाटतो. हिवाळ्यात खाल ते पचेल या उक्तीप्रमाणे विविध खाद्यपदार्थांचा मनोसक्त आस्वाद घेणारी भूक याच दिवसांत वाढती आहे. ती भूक भागविण्याची क्षमताही निसर्गाने निर्माण केली आहे. त्याच्या छटा बाजारात आलेल्या हिरव्यागार, लाल, पिवळ्या, जांभळ्या अशा बहुरंगी भाज्या, फळांच्या रूपातून दिसत आहेत. रोज साडेचारशे टन भाजीपाला, फळे बाजारात येत आहेत. अशा बहुरंगी भाज्या व फळांच्या ढिगांनी बाजारपेठेला सौंदर्याची जोड लाभली आहे. बाजारात एखादा फेरफटका मारला, की भाजीपाला, फळांच्या रंगाचे मोहक रूप व गुलाबी थंडीचा प्रसन्नतेचा साज देत आहे. 

मोहक रंग, रूपातील भाजीपाला, फळांची तुडुंब अशी आवक झाली आहे. हिवाळ्यातील भाज्या व फळांचे हे रूप मोहक तितकेच आरोग्यदायी आहे. असे रूप हिवाळ्यात कसे येते त्याविषयी शेतीमाल अभ्यासक डॉ. डी. एस. पाटील म्हणाले, ""पावसाळ्यात किंवा तत्पूर्वी लागवड केलेल्या भाजीपाला, फळे, भाज्यांना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तोड येते. त्यात ऑक्‍टोबर महिन्यातील कडक उन्हात भाजीपाल्यांवरील वेल, आळ्या, हानीकारक किडी मरून जातात तेव्हा झाडांची फलधारण क्षमता वाढते. तिथून पुढे येणाऱ्या सूर्यकिरणातून मिळणारे "डी' हे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात झाडे शोषूण घेतात. फल धारणा बळकट होते. नुकताच संपलेला पावसाळा, नव्याने सुरू झालेली उन्हाची तिरीप यांमुळे शेतजमिनीतील नैसर्गिक ओलावा, तापमान कायम राहतो. त्यातून प्रत्येक फळात गाभा (गर) तयार होतो. झाडांच्या मुळातून शोषलेले पाणी फळापर्यंत येते. त्यामुळे प्रत्येक फळभाजीत पाण्याचा अंश जास्तपणा दिसून येतो. या गाभ्यातील पाण्याचा अंश, शुद्धता तीव्र असते. हिवाळ्यातील थंडीमुळे उन्हाची दाहकतेची झळ फळांना किंवा फळ जास्त तीव्रपणात जाणवत नाही. त्यामुळे त्याचे नैसर्गिक हिरवेपणा टिकून राहते तसेच जमिनीतील माती, पोत, सेंद्रिय खतांची मात्रा व सूर्यकिरण पुरेशा प्रमाणात मिळाल्याने फळांचा, भाजी रंगही चांगला होण्यास मदत होते.'' 

जांभळ्या, रंग, हिरवट, पांढऱ्या रंगाची वांगी शिरोळ भागातून आली आहेत. पाणतळाच्या भागात गाजर लालबुंद येते. अशा रसरशीत, पाणीदार गाजरांची आवक सर्वच भागांतून आहे. त्याचा वापर हलव्यासाठी केला जातो. त्याची मागणी जास्त आहे. पिवळे धमक लिंबू सांगोला, कवठेमहंकाळ भागातून येत आहे. मध्यप्रदेशातून, कर्नाटकातून आलेल्या हिरव्या वाटाण्याच्या शेंगा, सीमाभागातील मेथी, कांदापात, कोथिंबीर यांचा हिरवा रंग मोहक आहे. नागपुरातून आलेली संत्री नारंगी रंगाची आहेत. मराठवाडा मोसंबी नगर भागातून आली आहेत. दार्जिलिंगवरून येणारी सफरचंदे आठ दिवसांचा प्रवास करून येतात. नैसर्गिक उष्मांकातून त्याचा रंग पिवळा लाला भगवा असा होतो. अशा वेगवेगळ्या भाज्या व फळे सध्या हिवाळ्यातील खास आकर्षण बनल्या आहे. 

रोजची आवक (कंसात भाव प्रति दहा किलोचे) 
पालेभाज्या एक लाख पेंड्या (200 ते 400 रुपये शेकडा) 
फळभाज्या वांगी, दोडका, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार 250 टन (180 ते 350 रुपये) 
सफरचंद, पेरू, मोसंबी, संत्री 40 ते 50 टन (20 ते 100 रुपये किलो). 

Web Title: Winter vegetables, fruit