युरेशियन भुवई बदक आमणापुरात दाखल

कोंडार परिसरात पहिल्यांदाच दर्शन
wintering birds
wintering birds

अंकलखोप : प्रामुख्याने गोड्या पाण्याच्या साठ्याजवळ आढळणारा भुवई बदक म्हणजेच गार्गनेय हा बदक प्रजातीतील दुर्मीळ पक्षी आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कोंडार परिसरात तो आढळल्याची नोंद पक्षिनिरीक्षकांनी केली आहे. ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध झाली आहे. भुवई बदक स्थलांतरित प्रकारातील पक्षी असून, जमिनीवर, पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी तो वास्तव्य करू शकतो. उभयचर पक्षी समजला जाणारा हा बदक प्रामुख्याने युरेशिया येथे आढळतो. हिवाळ्यात तो आफ्रिका, दक्षिण आशिया येथे स्थलांतर करतो. हा पक्षी गोड्या पाण्याच्या जलाशयांजवळ आढळतो. येथे चिखलात आढळणारे कीटक त्याचे प्रमुख खाद्य असते.

आकाराने छोटा, सहजासहजी डोळ्यात भरेल असा नसलेला भुवई बदक हा पाणथळ क्षेत्रालगतच्या खडकाळ प्रदेशात वास्तव करतो. नरपक्षी हा देखणा असतो. त्याच्या डोक्यावरील भाग काळ्या रंगाचा तर मानेजवळील भाग तपकिरी रंगाचा असतो. या पक्ष्याच्या भुवयांजवळ पांढरा पट्टा असतो. तर पंखांचा रंग राखाडी असतो. मादी पक्ष्याची शरीररचना जवळपास सारखी असते. मात्र मानेजवळील रंगात आणि पंखाच्या आकारात काहीसा फरक असतो.

आमणापूर येथील पक्षी निरीक्षक संदीप नाझरे यांना आठ मार्चला हा पक्षी आमणापूर येथील कोंडार परिसरात आढळला. त्यानंतर नाझरे यांनी त्याची नोंद ‘ई-बर्ड’ या पक्षी निरीक्षणसदर्भातील संकेतस्थळावर केली.

क्वचितच आढळणारा हा पक्षी, दुर्मिळ प्रजातीतील पक्ष्यांच्या यादीत सामाविष्ट असून, यापूर्वी गेल्या महिन्यात सांगली शहरातील दलदलीच्या भागात त्याची नोंद झाली आहे. या पक्ष्याचे अस्तित्व हे जलाशयातील पाणी शुद्ध असल्याचे प्रतीक मानले जात असल्याची माहिती पक्षी निरीक्षकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com