सांगली : पुर ओसललेल्या भागात वीज चालु करताना वायरमनचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

तुंग - दुधगाव (ता. मिरज) येथे दुपारी पुरग्रस्त भागातील पाणी ओसरल्यानंतर वीज चालु करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. संजय बाळासो जाखले (38, रा. खोची ता. हातकणगले जि. कोल्हापूर) असे मृत वायरमनचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  दुधगाव सावळवाडी या मार्गावर वायर जोडत असताना अचानक विद्युतप्रवाह चालु झाला.  या तारातील विजेचा झटका बसुन ते खाली पाण्यात पडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला.तातडीने या भागातील विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आला. 

जाखले हे दुधगावमध्ये गेल्या दहा वर्षापासुन कार्यरत आहेत. ते खोचीतुन ये जा करत होते. पुराच्या अगोदर त्यांची कवठेपिरानमध्ये बदली झाली होती, परंतु त्यांचा चांगला स्वभाव व आपुलकीची सेवा यामुळे दुधगावकरांची मने जिकली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली होती. 

पुराच्या कालावधीत त्यांनी दुधगावमध्ये मुक्काम करत. या भागातील विद्युतपुरवठा खंडीत होऊ दिला नाही. सगळ्यांना उजेडात ठेवणारे संजय यांच्या मृत्यूने दुधगावसह खोची गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wire man dies while repairing electricity in flooded areas