पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय गिरवलेंवर अंत्यसंस्कार नाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर : पोलिस कोठडीत असताना नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असून, त्यास पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप गिरवले यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गिरवले यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

त्यासाठी गिरवले यांचा मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 
पोलिस कोठडीत असलेल्या गिरवले यांची प्रकृती रविवारी सकाळी बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गिरवले यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितल्याने गिरवले यांना तत्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे सोमवारी रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच गिरवले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे व पोलिस कॉन्स्टेबल काळे व अन्य पाच ते सहा पोलिस कर्मचारी जबाबदार असल्याची तक्रार गिरवले यांचे बंधू बाबासाहेब यांनी काल (ता. 17) रात्री उशिरा पुण्यातील बंडगार्डन पोसिल ठाण्यात दिली आहे. त्यावरुन अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घातला. त्याप्रकरणी नगरसेवक गिरवले यांना पोलिसांनी अटक केली होती. 

Web Title: Without action on the police there is no funeral on Girawale