ब्लॅकमेल केल्याचा महिलेवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मलवडी - माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे खासगी सहायक अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून एका महिलेसह तिघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्याची आणि त्यासाठी ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार गोरे यांच्यावर असलेल्या विनयभंग प्रकरणाशी याचा संबंध असून, प्रदीप जाधव (रा. दहिवडी), विवेकानंद सावंत (नवी मुंबई) आणि या प्रकरणाशी संबंधित सातारा येथील महिलेवर भारतीय दंडविधान कलम 385 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शेखर गोरे यांचे विधान परिषद निवडणुकीत आमदार होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते. त्यामुळे सर्व विरोधक आमदार गोरे यांना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्‌ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रदीप जाधव यांनी मला समक्ष भेटून सांगितले, की तुम्ही विवेकानंद सावंत यांना ठराविक रक्कम द्या; अन्यथा आम्ही आमदार गोरेंना एका महिलेच्या मदतीने खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्‌ध्वस्त करू. जाधव यांच्या सांगण्यावरून मी सावंत यांच्याशी नवी मुंबई येथील रघुलीला मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये चर्चा केली. सावंत यांनी माझ्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. आमदार गोरे यांचे विरोधक त्या महिलेला मोठ्या रकमा देण्याचे आश्‍वासन देत आहेत, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर जाधव यांनी मला सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पुढे काय झाले अशी विचारणा केली. लवकर रक्कम देऊन विषय संपवा, असेही सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी संबंधित महिलेने मला व्हॉट्‌सऍपवर मेसेज करून भेटण्यासंदर्भात विचारले. एक ऑक्‍टोबर 2016 रोजी मला साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात भेटण्यास बोलवले. त्या वेळी संबंधित महिलेने सावंत यांच्याशी झालेली चर्चा पटत नसल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली.
याप्रकारे प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत व संबंधित महिलेने संगनमत करून आमदार गोरे यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची भीती घालून मोठ्या रकमेची मागणी करून ती वसूल करण्याचा प्रयत्न केला म्हणून अभिजित काळे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात ब्लॅकमेलिंग व खंडणीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत.

Web Title: The woman on the crime of blackmail