भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू

अभिजित कुलकर्णी
सोमवार, 16 जुलै 2018

हेरले (कोल्हापूर) : हेरले (ता. हातकणंगले) येथील काटकर यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली. अनिता रविंद्र काटकर (वय 37) असे मृत महिलेचे नाव आहे. यामध्ये दोन मुलांसह तीघजण गंभीर जखमी आहेत. रविंद्र बापू काटकर (वय ४42), अनिकेत (वय 20), शिवानी (वय 17) अशी जखमींची नावे आहेत. कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना आज पहाटे चार वाजता घडली.

हनुमाननगर, सुतार गल्ली माळभाग येथे रिक्षाचालक रविंद्र बापू काटकर यांचे दोन खोल्यांचे घर आहे. घरात पत्नी व दोन मुलांसह चौघेजण राहतात. पहाटे चारच्या दरम्यान अचानक दोन्ही खोल्यांच्या भिंती कोसळल्या.यामध्ये अनिता यांच्या डोक्यास व पोटास गंभीर मार बसला व त्या ठार झाल्या. रविंद्र, अनिकेत व शिवानी यांच्या पायाला व हाताला मोठी दुखापत होऊन गंभीर जखमी झाले.

भिंती कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील अमिर पेंढारी, गुंडू परमाज, रफिक पेंढारी, पोपट सुतार यांनी प्रसंगावधान राखत या ठिकाणी थाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. चौघांच्या अंगावरील दगड, माती, वीटांचा थर बाजूला करीत ढिगाऱ्यातून चौघांना बाहेर काढले. तात्काळ खाजगी वाहनातून उपचारासाठी कोल्हापूरला पाठविण्यात आले. चौघांवर उपचार करीत असतांना अनिता रविंद्र काटकर यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असताना मयत झाल्या. तिघांना पायाला हाताला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्या उपचार सुरू आहेत.

Web Title: woman die due to fallen wall