महाबळेश्वरजवळ अपघातात महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

सातारा : महाबळेश्वर ते मेढा रस्त्यावर केटीएम व पल्सर या दुचाकीची रेस सुरू असताना केटीएमची समोरून येणाऱ्या स्प्लेंडरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रंजना कृष्णा शेलार (वय 50, रा. वाघदरे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सागर कृष्णा शेलार गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वरवरून धूम स्टाईलने रेस करत येणारा दुचाकी चालक अक्षय शिंदे हा युवकही या अपघातात गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर वरून रेसिंगच्या उद्देशाने दोन दुचाकी निघाल्या होत्या. घाटातून भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या हिरो होंडा दुचाकीला गवडी (ता.जावळी) हद्दीत जोरदार धडक दिली. स्प्लेंडर गाडीवर बसलेले मायलेक गंभीर जखमी झाले. रंजना शेलार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मेढा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: a woman died in accident near mahabaleshwar