विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मोहोळ : शेतात खुरपण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डोकेवस्ती मोहोळ येथे घडली. राजश्री दिनकर डोके (रा. डोके वस्ती, मोहोळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील डोके वस्ती येथे राहणाऱ्या राजश्री दिनकर डोके या शेतात खुरपण्यासाठी जाते म्हणून घराबाहेर पडल्या. त्या विहिरीमध्ये पडून मृत झाल्या. दरम्यान, राजश्री यांचे दीर सुधाकर डोके हे विहिरीवरील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला. त्यांनी व्यवस्थित जाऊन पाहिले असता सदरची महिला ही त्यांची भावजय राजश्री डोके ही असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानुसार त्यांनी याबाबत घरी जाऊन कुटुंबियांना माहिती दिली व मोहोळ पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिली. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. तपास हवालदार अभिजीत घाटे करीत आहेत.

Web Title: Woman Died after lying in the well

टॅग्स