कालव्यात बुडून महिलेचा मृत्यू 

 Woman dies after drowning in canal
Woman dies after drowning in canal


सलगरे : संतोषवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथील दह्यारीकर वस्तीनजीक असणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या संतोषवाडी-जानराववाडी शाखा कालव्यात बुडून रुक्‍मिणी प्रकाश वाळके (वय 45) या महिलेचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही महिला अंघोळीच्या निमित्ताने कालव्यात उतरली असेल व त्यावेळी प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिला पोहता येत नसल्याने ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

रुक्‍मिणी वाळके या संतोषवाडी येथील वाळके दह्यारकर वस्तीनजीक असलेल्या म्हैसाळ योजनेच्या शाखा कालव्यालागत त्या आपल्या सासू समवेत रहात होत्या. रुक्‍मिणी वाळके याना पती व मुले नाहीत. आज सकाळी सासू मजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या. साडेनऊच्या दरम्यान त्या शेजारच्या कालव्यात हात पाय धुणे अथवा अंघोळीसाठी गेल्या असतील, यापूर्वीही त्या कालव्यामध्ये उतरत 

असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पण आज मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या वाहत जाऊन खोलवर पाणी असणाऱ्या ठिकाणी बुडाल्या. शाखा कालव्यास खटाव दिशेने जाणाऱ्या आउटलेट व्हॉल्व्हमधून पाणी सोडणे सुरू होते या व्हॉल्व्हला असणाऱ्या तोंडास त्यांचा मृतदेह अडकला होता. कालव्याच्या निरीक्षण रस्त्यावरून एका दुचाकीस्वाराला हा व्हॉल्व्हच्या तोंडाला लटकलेला मृतदेह दिसला असता त्याने शेजारी द्राक्षबागेत काम करणाऱ्या लोकांना ओरडून सांगितलेवर मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यावेळी त्या बुडून मृत झाल्याचे दिसून आले. या घटनेबाबत पोलिसांना कळवले असल्याचे स्थानिक व काही नातेवाईक यांनी सांगितले. वाळके यांच्या मागे सासूबाई आहेत. 

महिला मतिमंद असल्याने दुर्दैवी घटना ? 
दरम्यान घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार रुक्‍मिणी ह्या मतिमंद व बुद्धीने साधारण होत्या अशीही स्थनिकांत चर्चा होती. त्या मतिमंद असल्याने कालव्यातून आज वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या वाहत जाऊन बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू ओढवला असल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. यावेळी सरपंच हणमंतराव गायकवाड, पोलीस पाटील शहाजी पाटील, मिरज ग्रामीण पोलीस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com