
महिलेच्या नातेवाईकांनी आमची तक्रार नाही. आम्हाला शवविच्छेदन न करता मृतदेह द्यावा अशी मागणी डॉ. हुक्किरे यांच्याकडे केली. मात्र हुकीरे यांनी पोलिसांत मृत्यूची नोंद दिली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी शवविच्छेदन करूनच नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल, अशी भूमिका घेतल्याने नातेवाइकांनी डॉ. हुक्किरे यांच्याविरुद्ध संताप व्यक्त झाला.
कुरुंदवाड ( कोल्हापूर ) - येथील हुक्किरे मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हिना सादिक पठाण (वय 23 रा. चंदूर ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. मृत्यूची नोंद डॉ. जमीर हुक्कीरे यांनी पोलिसांत दिल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉ. हुक्किरे यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली.
इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
इनकॅमेरा शवविच्छेदन करून अहवाल मिळावा, अशी मागणी करत जमावाने गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला. अखेर मिरज येथील शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हिना पठाण यांचा विवाह दीड वर्षापूर्वी चंदूर येथील सादिक पठाण यांच्याशी झाला होता. हिनाचे कुरुंदवाड माहेर असून ती प्रसूतीसाठी आली होती. तिला येथील हुक्किरे मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी (ता. 11) दाखल केले होते. रात्री तिची प्रसूती झाली; मात्र सोमवारी रात्री तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉ. हुक्केरी यांनी अन्य डॉक्टरांना बोलावून घेतले होते; मात्र हिना यांचा आज मृत्यू झाला.
हुक्किरे यांच्याविरुद्ध संताप
महिलेच्या नातेवाईकांनी आमची तक्रार नाही. आम्हाला शवविच्छेदन न करता मृतदेह द्यावा अशी मागणी डॉ. हुक्किरे यांच्याकडे केली. मात्र हुकीरे यांनी पोलिसांत मृत्यूची नोंद दिली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी शवविच्छेदन करूनच नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल, अशी भूमिका घेतल्याने नातेवाइकांनी डॉ. हुक्किरे यांच्याविरुद्ध संताप व्यक्त झाला. मृताचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात ठाण्यात जमल्याने व डॉ. हुक्कीरे यांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करीत गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस निरीक्षक निरावडे यांनी नातेवाइकांची समजूत काढत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
पश्चिम घाटात आढळली ही नवी वनस्पती
गियरची भानगड आली लक्षात अन् अडाणी बाबा झाले उत्कृष्ठ मेस्त्री