ही बाई वर्षभरापासून पाणी प्यायली नाही....खरंय हे, बघा.. 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

एक बाईय ३५ वर्षांची ती म्हणं पाणी पेत नाही. वर्षभरापासून ती अशीच जगतीय. काय तपाला बसली का काय.. दुसरं म्हणजे ती काही हिमालयातल्या साधुबिधूची गोष्ट नाही. मग आहे तरी कोण.. त्या तिकडं पलिकडे देश आहे ना इंडोनेशिया नावाचा तिकडलं हे. कोरोनासारखी व्हायरल झालीय तिची ही बिनपाण्याची गोष्ट. 

नगर ः अमका साधू नुस्ता हवेवर जगतो, सहासहा महिनं काहीच खात-पेत नाही. या असल्या गप्पा गावच्या पारावर ऐकल्या असतील. लहान असतानाही असं कुणी कुणी आपल्या कानावर काहीबाही घालतं आणि ते आपल्यालाही खरं वाटतं.त्या लहानपणीच्या गोष्टींचं नंतर आपल्यालाच हसायला येतं. हो, पण थांबा ती लहानपणी ऐकलेली गोष्ट खरीय लेकांनो.

एक बाईय ३५ वर्षांची ती म्हणं पाणी पेत नाही. वर्षभरापासून ती अशीच जगतीय. काय तपाला बसली का काय.. दुसरं म्हणजे ती काही हिमालयातल्या साधुबिधूची गोष्ट नाही. मग आहे तरी कोण.. त्या तिकडं पलिकडे देश आहे ना इंडोनेशिया नावाचा तिकडलं हे. कोरोनासारखी व्हायरल झालीय तिची ही बिनपाण्याची गोष्ट.

sofiya tarfik

नेमकं काय करते
सोफी फार्तिक असं नावंय तिचं. कसं जमतं बॉ तिला.. असले प्रश्न आपल्याला पडणारच. तर ती काही साधू किंवा तपस्वी नाही. हाँ, पण ती न्यूट्रीशियन कोच आहे. योगा टीचर पण आहे. ड्राय फास्टिंग करते म्हणत्यात. म्हणजे नेमकं काय करते तर ती पक्त नारळाचं पाणी पिते. फळांचा ज्यूसही लागतो. शरिराला जे आवश्यक घटक हवे असतात ते फळ, भाज्या आणि ज्यूसमधून घेते, तसं डेली मेलच्या रिपोर्टमध्ये नमूद केलंय. 

का करते ती असं 
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती असं का करीत असावी.हा, हे महत्त्वाचंय, बाकी काय करायचं आपल्याला. तर सोफीचं असं म्हणणं आहे की, ती शरीरासाठीच करते. असं केल्याने तिचे अनेक आजार लांब पळाले आहेत. तिच्या डोळ्यांना सूज यायची, सांधेदुखीने तर ती परेशान असायची. काही दुसरं अन्न खाल्लं तरी अॅलर्जी व्हायची. काही खाल्लं तरी पचनाची समस्या असायची. सोफीनं असं बिनपाण्याचं किंवा डाएट ठरवून घेतलं तेव्हापासून वरचे सगळे आजार कुठल्या कुठे पळाले. यावर एका मित्राला उपचार सांगितला आणि सोफीने तो आमलात आणला. त्या पूर्वी बराच रिसर्च केल्याचे सोफी सांगते. 

पाण्याची गरज नाही 
सोफी सांगते खरं तर आपल्या शरीराला पाण्याची गरज नाही. नळाचं पाणी पिलं तर त्यातील दुषितपणामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे जे आवश्यक घटक आहेत, ते निघून जातात. ड्राय फास्टिंग केल्यावर आपल्याला कळेल की शरीरीला पाण्याची गरज नाही. तसं तिचं टार्गेट वेगळं आहे.

काहीच न घेता राहायचंय

दहा दिवस काहीच न घेता राहायचंय. त्यात तिला थोडं यशही मिळालंय. ५२ तास अशा प्रकारे तिने घालविले आहेत. एवढं सगळं करते पण ती कुणालाही आपल्यासारखं करण्याचा सल्ला देत नाही. जर कुणाला असं अनुकरण करायचं असेल तर एक तर जज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि सुरूवातीला फक्त फळ आणि भाज्या खाऊन ट्राय करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This woman does not drink water