ब्रेकिंग ः नाजूक कारणातून गोळीबार...तो खिशातच मृत्यू घेऊनच आला होता

Woman shot dead in Wadjire
Woman shot dead in Wadjire

पारनेर : तालुक्यातील वडझिरे येथे आज (ता.17)रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. पिस्तूलातून केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमका कोणत्या कारणातून ही घटना घडली हे समजू शकले नाही.

सविता सुनील गायकवाड (वय 35)  असे या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.

इथं लागल्या गोळ्या

या वादात एका तरुणाने स्वतः कडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्याने एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या हाताच्या पंजाला दुसरी मानेला तर तिसरी गोळी कानाजवळ घुसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरडाओरडा केल्यानंतर जमाव जमला

गोळीबारानंतर ते दोघे तरूण पळून गेले. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रूग्णालयात तणाव

दरम्यान गायकवाड यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर मोठा जमाव जमला होता. रूग्णवाहिका थेट पोलीस ठाण्यात नेण्यासाठी जमाव आग्रह धरीत होता.मात्र, चालकाने तिथेच मृतदेह उतरवून घेण्यास सांगितल्याने तणाव निर्माण झाला होता.

पोलीस उपाअधीक्षकांची भेट

पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना केले आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या मुलीने एका व्यक्तीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यातून हा वाद झाल्याची चर्चा परिसरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com