मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणताच पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते.
सांगली : कवठेमहांकाळ शहरात धुळगाव रस्ता परिसरातील शानाबाई शंकर जाधव (वय ५८) या महिलेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने (LCB Squad) कौशल्य पणाला लावत बाज (ता. जत) येथील तरुणास जेरबंद केले. किरण आकाराम गडदे (वय २०) असे संशयिताचे नाव आहे. मालगावात पथकाने छापेमारी करून गडदे याला ताब्यात घेतले.